सांगली : सांगली, खानापूरसह जतमध्ये विधानसभा निवडणुकीत झालेली बंडखोरी महायुती व महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांना आव्हानात्मक ठरणार आहे. यामुळे या तीन मतदारसंघांतील लढती लक्षवेधी ठरल्या आहेत. विशेषत: सांगलीत काँग्रेसच्या जयश्री पाटील यांच्या बंडखोरीमुळे माजी राज्यमंत्री विश्वजित कदम यांची कोंडी झाली असून खासदार विशाल पाटील यांचीही कसोटी ठरणार आहे.

सांगलीमध्ये महाविकास आघाडीतून काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांना अधिकृत उमेदवारी जाहीर झाली. मात्र, सुरुवातीपासूनच श्रीमती पाटील यांची बंडखोरीची भाषा होती. पक्षाच्या पातळीवरून डॉ. कदम व खा. पाटील यांनी बंडखोरीपासून त्यांना परावृत्त करण्याचा प्रयत्न अखेरपर्यंत केला. मात्र अखेरपर्यंत मैदानातून बाहेर पडण्यास नकार देत श्रीमती पाटील यांनी बंडखोरी कायम ठेवली. यामुळे आमदार डॉ. कदम यांना खुल्या मनाने काँग्रेस उमेदवाराचा प्रचार करता येईल का, हा जसा प्रश्न आहे, तसाच खा. पाटील यांना पक्ष पाहायचा का नातेसंबंध राखायचे असा प्रश्न पडणार आहे. काँग्रेसमधील बंडखोरीचा फायदा भाजप कसा घेतो, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष आघाडी सोबत किती राहतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

What Devendra Fadnavis Said About Brahmin Cast
Devendra Fadnavis : ‘ब्राह्मण असणं राजकीयदृष्ट्या अडचणीचं ठरतंय का?’ देवेंद्र फडणवीस म्हणाले, “जात…”
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
tasgaon vidhan sabha money with Diwali faral
सांगली: दिवाळी फराळासोबत पैशांचे वाटप; तासगावमध्ये १ लाख रुपये जप्त
maharashtra assembly election 2024
काँग्रेस अखेर शंभरीपार, अर्जमाघारीनंतर सर्वच पक्षांची अंतिम आकडेवारी आली समोर; वाचा काय आहे नेमकं समीकरण!
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
sharad pawar retirement (1)
Video: शरद पवारांचे राजकारणातून निवृत्तीचे संकेत, आता राज्यसभेतही जाणार नाही? भाषणात म्हणाले…
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

हेही वाचा :कार्तिकी वारीनिमित्त विठ्ठलाचे २४ तास दर्शन ! सावळ्या विठुराया भक्तांसाठी उभा

जतमध्ये भाजपचे प्रचारप्रमुख तमणगोंडा रविपाटील यांची बंडखोरी असून त्यांनी माजी आमदार विलासराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. आमदार गोपीचंद पडळकर व आमदार विक्रम सावंत या दोन विद्यमान आमदारांना बंडखोराशी सामना करावा लागणार आहे. या ठिकाणी बंडखोराकडून स्थानिक विरुध्द बाहेरील असा प्रचार करून निवडणूक लढवली जात आहे.

तर खानापूर मतदारसंघातून महाविकास आघाडीने राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या वैभव पाटील यांना उमेदवारी दिली असून त्यांचे पारंपरिक विरोधक बाबर गटाचे सुहास बाबर यांच्याशी लढत गृहीत असताना अखेरच्या टप्प्यात आटपाडीची अस्मिता घेऊन माजी आमदार राजेंद्र देशमुख यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली होती. मात्र, त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. त्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. आटपाडी तालुक्यात देशमुख वाड्यावर निष्ठा असलेला मतदार वर्ग आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी कुणाला लाभदायी ठरते की नुकसानकारक ठरते हे येणारा काळच सांगणार आहे.

हेही वाचा :Devendra Fadnavis : महायुतीचा पुढचा मुख्यमंत्री कोण? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आमचं धोरण…”

जिल्ह्यात तीन ठिकाणी बंडखोरी झाली असून सर्वात लक्षवेधी बंडखोरी सांगली व जतची ठरणार आहे. या दोन्ही ठिकाणी काँग्रेसचे नेते आ. डॉ. कदम यांची कसोटी लागणार आहे. सांगलीतील बंडखोर श्रीमती पाटील यांच्याशी कदमांच्या सोनसळशी नातेसंबंध असून तर जतमध्ये त्यांचे मावसबंधू विद्यमान आमदार सावंत हे काँग्रेसचे उमेदवार आहेत. खा. पाटील यांना लोकसभेवेळी श्रीमती पाटील यांनी सांगलीत तर जतमध्ये माजी आमदार जगताप यांनी भाजप नेतृत्वाचा आदेश डावलून मदत केली होती. यामुळे त्यांचीही आघाडी धर्म पाळताना कसरत होणार आहे.

Story img Loader