सांगली : कृष्णा खोऱ्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णामाईने सोमवारी दत्तदर्शनासाठी औदुंबरच्या मंदिरात शिरकाव केला. नदीची पाणी पातळी रात्रीत ९ फूट ८ इंचांनी वाढली असून औदुंबरच्या दत्त मंदिर परिसरात पाणी शिरले. चांदोली धरणाच्या सांडव्यापर्यंत पाणी आल्याने कोणत्याही वेळी विसर्ग करण्यात येणार असल्याने वारणा काठच्या लोकांना सतर्क राहण्याचा इषारा देण्यात आला आहे. औदुंबरनजीक भिलवडी पुलाजवळ काल सायंकाळी १९ फूट २ इंच असणारी पाणी पातळी सोमवारी सकाळी २८ फूट १० इंच झाली. नागठाणे बंधारा दुसऱ्यांदा पाण्याखाली गेला असून औदुंबरच्या दत्त मंदिर परिसरात कृष्णामाई शिरली आहे. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या २४ तासात कोयना येथे १७६, महाबळेश्वरमध्ये २४५ आणि नवजामध्ये २३६ मिलीमीटर पाऊस झाला. धरणात ६०.४३ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. हेही वाचा - “आम्ही तुमच्यासारखे ‘जिना फॅन्स क्लब’चे सदस्य…”, अमित शाह यांच्या ‘त्या’ टीकेला संजय राऊतांचे प्रत्युत्तर! हेही वाचा - Shivaji Maharaj Waghnakh: “मिंधे-फडणवीसांनी पिसाळ-खोपड्यांप्रमाणे…”, ठाकरे गटाचा हल्लाबोल; वाघनखांवरून टीकास्र! वारणेवरील चांदोली धरणाजवळ ७८ मिलीमीटर पाऊस नोंदला असून सांडव्यापर्यंत पाणी पोहोचले आहे. धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी आज वक्राकार दरवाज्यातून पाणी सोडण्यात येणार असल्याचे धरण व्यवस्थापनाकडून कळविण्यात आले आहे. यामुळे वारणा नदीतील पाणी पातळी वाढणार असल्याने वारणाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इषारा देण्यात आला आहे.