गुवाहाटीला आधी गेले त्यांचा मंत्रिमंडळात समावेश नाही? संजय गायकवाड म्हणाले…

सर्वात आधी शिवसेनेत बंडखोरी करत शिंदे सहभागी होणाऱ्या आणि गुवाहाटीला जाणाऱ्यांना मंत्रिमंडळात समावेश झाला नाही, असाही आरोप होतोय.

गुवाहाटीला आधी गेले त्यांचा मंत्रिमंडळात समावेश नाही? संजय गायकवाड म्हणाले…
संजय गायकवाड व एकनाथ शिंदे

राज्यात शिंदे-फडणवीस सरकारचा अखेर दीड महिन्याने मंत्रीमंडळ विस्तार झाला. यात एकनाथ शिंदे गटातून नऊजणांना संधी मिळाली. मात्र, त्यानंतर शिवसेनेतून बंडखोरी करणाऱ्या शिंदे गटातून काहीसा नाराजीचा सूरही निघत आहे. बच्चू कडूंनी जाहीर नाराजी व्यक्त केली. ज्या आमदारांनी सर्वात आधी शिवसेनेत बंडखोरी करत शिंदे सहभागी होणाऱ्या आणि गुवाहाटीला जाणाऱ्यांना मंत्रिमंडळात समावेश झाला नाही, असाही आरोप होतोय. यावर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

संजय गायकवाड म्हणाले, “काही लोक मागून आले हे खरं जरी असलं तरी हा विस्तार झाला तो कॅबिनेट मंत्र्यांचा झाला आहे. फारसे आमदार नाराज आहे असे मला वाटत नाही.”

“बच्चू कडूंना कॅबिनेटची अपेक्षा होती का?”

“आमदार बच्चू कडू यांची प्रतिक्रिया मी पाहिली आहे. त्यांना अपेक्षा होती की आपला पहिल्या रांगेत नंबर लागला पाहिजे. मागच्या काळात ते राज्यमंत्री होते आणि राज्यमंत्र्यांचा विस्तार अजून बाकी आहे. त्यांना कॅबिनेटची अपेक्षा होती का, तशी त्यांनी मागणी केली होती का हे मला माहिती नाही,” असं गायकवाड यांनी सांगितलं.

“बच्चू कडूंना राज्यमंत्रीपदाची अपेक्षा असेल तर…”

ते पुढे म्हणाले, “बच्चू कडूंना राज्यमंत्रीपदाची अपेक्षा असेल तर तो पुढच्या महिन्यामध्ये विस्तार होणार आहेत. गेल्या महिन्याभरापासून प्रलंबित असलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार राजभवनावर ९ ऑगस्ट रोजी १८ मंत्र्यांचा शपथविधी पार पडला.”

हेही वाचा : “मी मुख्यमंत्र्यांना पुन्हा आठवण करून द्यायला आलो की…”, एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर धनंजय मुंडेंचं वक्तव्य

“पहिल्या टप्प्यात शिंदे गट आणि भाजपाकडून प्रत्येकी नऊ अशा एकूण १८ मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला,” असंही गायकवाडांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Video : भाजपाचं चिन्ह, नाव असलेल्या राष्ट्रध्वजांचं वाटप, “हा देशद्रोह नाही का?” काँग्रेसचा संतप्त सवाल!
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी