VIDEO: "संजय राऊतांच्या तोंडात त्यांच्या आईने...", आमदार गायकवाडांचा संजय राऊतांवर हल्लाबोल | Sanjay Gaikwad criticize Sanjay Raut mentioning his mother in Buldhana | Loksatta

VIDEO: “संजय राऊतांच्या तोंडात त्यांच्या आईने…”, आमदार गायकवाडांचा संजय राऊतांवर हल्लाबोल

मागील काही दिवसांपासून शिंदे गटातील बंडखोर आमदार संजय गायकवाड आणि शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू आहे.

VIDEO: “संजय राऊतांच्या तोंडात त्यांच्या आईने…”, आमदार गायकवाडांचा संजय राऊतांवर हल्लाबोल
संजय गायकवाड, संजय राऊत व राऊतांची आई (लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

मागील काही दिवसांपासून शिंदे गटातील बंडखोर आमदार संजय गायकवाड आणि शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू आहे. हा वाद इतका टोकाला गेला की आमदार गायकवाडांनी एकदा बोलता बोलता राऊतांना शिवीगाळही केली. आता पुन्हा एकदा संजय गायकवाडांनी संजय राऊतांवर हल्ला चढवला आहे. ते रविवारी (४ डिसेंबर) बुलढाण्यात माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.

संजय गायकवाड म्हणाले, “संजय राऊत फाटक्या तोंडाचे आहेत. हिंदू धर्मात जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा पाचव्या दिवशी बाळाच्या तोंडात गोड मधाचं बोट फिरवलं जातं. हे लेकरू आयुष्यभर गोड बोलावं असा त्यामागे हेतू असतो.”

“…म्हणून संजय राऊतांची जीभ सारखी फडफड करते”

“मला वाटतं संजय राऊत यांच्या मातोश्री नेमकं हे विसरल्या. त्यामुळे संजय राऊतांची जीभ सारखी फडफड करते आणि ते बेताल वक्तव्य करत असतात,” असं म्हणत गायकवाडांनी राऊतांना टोला लगावला.

व्हिडीओ पाहा :

शिवीगाळ करत संजय गायकवाड काय म्हणाले होते?

संजय राऊतांनी नाशिक दौऱ्यावर असताना शिंदे गटावर निशाणा साधला होता. “चित्रपटांमध्ये जसं अमिताभ बच्चन यांच्या हातावर ‘मेरा बाप चोर है’ असं कोरलं होतं, तसंच शिंदे गटाच्या आमदारांच्या कपाळावर ‘गद्दार’ असं कोरलं आहे, याचा त्रास त्यांना पुढील अनेक पिढ्यांपर्यंत होईल, असं राऊत म्हणाले होते. राऊतांच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय गायकवाडांची जीभ घसरली. त्यांनी राऊतांना थेट शिवी दिली.

हेही वाचा : VIDEO: शिंदे गटाच्या आमदाराकडून शिवीगाळ, संजय राऊतांचं प्रत्युत्तर, म्हणाले, “तिथं ते शेपट्या घालत आहेत आणि…”

राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय गायकवाड म्हणाले, “आमच्यावर गद्दारी केल्याचा आरोप नव्हे तर आम्ही उठाव-क्रांती केल्याचा अभिमान आमच्या पुढच्या पिढ्यांना वाटणार आहे. त्यामुळे ‘****’ संजय राऊत तू यापुढे अशी भाषा वापरू नको. राहिला प्रश्न आम्ही लढायचं की पडायचं, तर आमचा निर्णय जनतेला मान्य आहे. तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत केलेली हातमिळवणी जनतेला मान्य नाही. शिवसेना-भाजपा म्हणून लोकांनी तुम्हाला निवडून दिलं होतं. अमिताभ बच्चनचा डायलॉग चित्रपटासाठी ठीक आहे, पण महाराष्ट्रात आमच्या किती जागा निवडून येतात आणि तुमच्या किती जागा निवडून येतात ते आपण बघू…” असं गायकवाड म्हणाले होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-12-2022 at 19:36 IST
Next Story
“मंत्रिपद गेलं खड्ड्यात, शिवरायांचा अपमान केल्यास…”, गुलाबराव पाटील संतप्त