परमबीर सिंग नक्की आहेत तरी कुठे? संजय निरुपमांनी दिलं उत्तर; म्हणाले,…

दरम्यान, ठाणे न्यायालय आणि मुंबईतील अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांनीही परमबीर सिंग यांना अजामीनपात्र अटक वॉरंट बजावलं आहे.

Sanjay Nirupam Parambir Singh

अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि त्या अनुषंगाने उलगडलेलं वसुली प्रकरण यामुळे चर्चेत आलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग गेल्या काही महिन्यांपासून जणू बेपत्ता आहेत. ते कुठे गेले? या बद्दल पोलिसांनाही ठोस माहिती नसल्याचं सांगितलं जात आहे. अशातच आता काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी परमबीर सिंग कुठे आहेत या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.

याबद्दलचं एक ट्वीट संजय निरुपम यांनी केलं आहे. आपल्या ट्वीटमध्ये ते म्हणतात, “हे मुंबई पोलिसांचे माजी पोलिस आयुक्त. मंत्र्यावर खंडणी वसुलीचा आरोप लावला होता. स्वत: पाच प्रकरणात वॉन्टेड आहेत. पोलिसांनी म्हटलं आहे की हे फरार आहेत. माहिती मिळाली आहे की ते बेल्जियमला आहेत. ते बेल्जियमला कसे गेले? यांना कुणी रस्ता मोकळा करुन दिला? आपण अंडरकव्हर अधिकारी पाठवून त्यांना परत आणू शकत नाहीत का?”

दरम्यान, ठाणे न्यायालय आणि मुंबईतील अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांनीही त्यांना अजामीनपात्र अटक वॉरंट बजावलं आहे. वारंवार समन्स बजावूनही परमबीर सिंह चौकशीला हजर राहत नाहीत. त्यामुळे हे वॉरंट बजावण्यात आलं आहे. परमबीर सिंग यांच्या विरोधात मुंबईसह ठाण्यात वसुलीप्रकरणी अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात लुकआऊट नोटीसही जारी करण्यात आलेली आहे. मात्र, अजूनही त्यांचा शोध लागलेला नाही. त्यामुळे ठाणे कोर्टानंतर आता मुंबईच्या किल्ला कोर्टाने त्यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sanjay nirupam claims that former mumbai police commissioner parambir singh is in belgium vsk

Next Story
‘कोरा कागद निळी शाई, आम्ही कोणाला भीत नाही’!
ताज्या बातम्या