वाई : संजय राऊत ही व्यक्ती विकृत आहे. यामुळे ती कधी छत्रपतींच्या घराण्याकडे वंशज असल्याचे पुरावे मागतात तर कधी आम्ही वंशज राजकारणासाठी तडजोडी करतो, अशी बडबड करतात. त्यांच्या वक्तव्याला सध्या महाराष्ट्रात कुणीही महत्त्व देत नाही, ही एक विकृत मनोवृत्तीची व्यक्ती असल्याची टीका खासदार उदयनराजे भोसले यांनी केली. उदयनराजे यांनी पत्रकार परिषद घेत राऊतांवर कडवट टीका केली. राजकारणात सध्या त्यांनी जे गमावले आहे, ते मिळवण्यासाठी ते वाटेल ते बोलत आहेत. त्यांना आपण काय बोलतो आहे याचेही भान नसते, असेही ते म्हणाले.

उदयनराजे म्हणाले, की राजकारणात एकमेकांवर टीका होत असते. परंतु संजय राऊत यांची वक्तव्ये पाहिली तर ती व्यक्ती विकृत वाटते. राजकारणात सध्या त्यांनी जे गमावले आहे, ते मिळवण्यासाठी ते वाटेल ते बोलत आहेत. त्यांना आपण काय बोलतो आहे याचेही भान नसते. मागे एकदा त्यांनी आमच्याकडेच वंशज असल्याचे पुरावे द्या अशा स्वरुपाची मागणी केली होती. हे असले प्रकार जनताच खपवून घेणार नाही.

nitin gadkari congress marathi news, nagpur lok sabha nitin gadkari latest marathi news
नितीन गडकरी म्हणतात, “ज्यांना अटक होण्यापासून वाचवले तेच आज विरोधात…”
Mentally healthy Psychotherapy Mental health problems
ताणाची उलगड: मानसिकदृष्ट्या निरोगी आहोत का?
Pankaja munde and jyoti mete
बीडमध्ये तिहेरी लढत? पंकजा मुंडेंसमोर आता ज्योती मेटेंचंही आव्हान; मविआनं डावलल्यानंतर म्हणाल्या, “पुढची पावलं…”
supriya sule, ajit pawar, sunetra pawar
“दुसऱ्यांच्या घरात मी कशाला डोकावू?”, असं का म्हणाल्या सुप्रिया सुळे