मुंबई: बारामती : पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही. पवार ह्या महायुतीच्या उमेदवार आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नाहीत असे मत शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी व्यक्त केले.

राज्यातील राहुरी व विधानसभेची पोटनिवडणुक २३ एप्रिल रोजी होणार आहे. ह्या दोन्ही पोटनिवडणुका बिनविरोध व्हाव्यात असा प्रयत्न महायुतीचे नेते करीत आहेत. महाविकास आघाडीत मात्र बेबनाव आहे. काँग्रेस बारामती पोटनिवडणुक लढवण्याच्या प्रयत्नात आहे. त्यावर राऊत यांनी पक्षाची भूमिका मांडली.

राहुरी आणि बारामती विधानसभेच्या जागा ह्या महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने लढवलेल्या होत्या. त्यामुळे या दोन्ही जागांबद्दल शरद पवार निर्णय घेतील, असे राऊत यांनी स्पष्ट केले.