भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर आलं आहे. चंद्रकांत पाटलांकडून करण्यात आलेल्या या विधानावरून आता राजकीय वर्तुळात संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांनी देखील भाजपावर निशाणा साधत, चंद्रकांत पाटील यांच्या त्या वक्तव्यावर टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“काल मी पाहिलं की भाजपाचे महाराष्ट्रामधील एक नेते शरद पवारांचा अरे, तुरे असा एकेरी भाषेत करत होते. ही राज्याची परंपरा नाही. आम्ही नरेंद्र मोदींचा उल्लेख कधीही अशाप्रकारे करत नाही. आम्ही अमित शाह विषयी कधीही अशाप्रकारे बोललो नाही. अटलबिहारी वाजपेयी तर आमचे श्रद्धास्थानच होतं आणि आहे. आडवाणींना आम्ही आजही मानतो. पण आपल्यापेक्षा वय, अनुभव, संस्कार, संस्कृतीने मोठे असलेले जी लोक आहेत, त्यांचा कायम आदर करावा. विचारांची लढाई विचारांनी लढावी. लोकशाही माध्यमातून त्यांचा पराभव करावा. हे आम्हाला महाराष्ट्राने शिकवलं. आणि तुम्ही काल राजकारणात आलेली लोक शरद पवारांसारख्या नेत्याचा उल्लेख एकेरीत करता. म्हणून मी म्हणतो यांची डोकी ठिकाणावर आहेत का? या संदर्भात चौकशी होणं गरजेचं आहे. वैद्यकीय देखील आणि नार्को पद्धतीने देखील.” असं संजय राऊत यांनी टीव्ही -9 शी बोलताना म्हटलं आहे.

“ काही लोक गांजा मारून काम करतात असं दिसतय ; बेताल बडबडणाऱ्यांची NCB ने आता नार्कोटेस्ट करावी ”

तर, “ या महाराष्ट्रात पवार आपल्याला चॅलेंज नाही, ५४ आमदाराच्या वर त्याला आम्ही जाऊ दिलं नाही. सगळं आयुष्य गेलं पण कधी ६० च्या वर क्रॉसच नाही झालं.” असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. यावर आज संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

दादरा नगर हवेलीचे अपक्ष खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईत मरीन ड्राईव्ह इथल्या एका हॉटेलमध्ये २२ फेब्रुवारीला आत्महत्या केली होती. त्यामुळे दादरा नगर हवेलीच्या रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणुक होत असून ३० ऑक्टोबरला मतदान होणार आहे. दिवंगत खासदार मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर आणि त्यांचे पुत्र अभिनव डेलकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश केला होता. तसेच, या पोटनिवडणुकीसाठी कलाबेन या शिवसेनेच्या उमेदवार असतील असं शिवसेनकडून घोषितही करण्यात आलं होतं व त्यांना उमेदवारी देखील देण्यात आली आहे. आता त्यांच्या प्रचारासाठी संजय राऊत सध्या सिल्वासामध्ये दाखल झालेले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut criticizes chandrakant patil msr
First published on: 17-10-2021 at 15:40 IST