या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवप्रताप दिनाच्या निमित्त आज किल्ले प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अनेक मंत्री पोहचले आहेत. या निमित्त गडावर अनेक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे. तर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपा प्रवक्ते सुधांशु त्रिवेदींनी शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे राज्यातील राजकीय वातावरण अद्यापही तापलेलं आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून या भाजपा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका सुरू आहे. दरम्यान आज मुख्यमंत्री प्रतापगडावर गेल्याच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.

हेही वाचा – “उदयनराजे भोसले यांचे अश्रू आम्ही पाहीले आहेत, ते …”; संजय राऊतांची प्रतिक्रिया

प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, “हा जल्लोष जो आहे तो जल्लोष महाराष्ट्रात नेहमी होतो. “छत्रपती शिवाजी महाराजांच्या काही महत्त्वांच्या दिवशी. शिवप्रताप दिनाचं महत्त्व समजून घ्या, जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानानंतर आपण राज्यपालांचा धिक्कार केला असता किंवा राज्यपालांना परत पाठवण्याची मागणी केली असती, तर आजच्या शिवप्रताप दिनाचं महत्त्व हे अधिक वाढलं असतं.”

नक्की पाहा – PHOTOS : नारायण राणेंचा उद्धव ठाकरे, शरद पवार, मल्लिकार्जुन खरगेंवर हल्लाबोल, म्हणाले…

याशिवाय, “महाराष्ट्राचा आणि शिवरायांचा अपमान करणारे राज्यपाल आजही राजभवनात आहेत आणि मुख्यमंत्री तोंड शिवून बसलेले आहेत. तिकडे भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते त्यांनी शिवरायांच्या अपमान करून ते त्यांच्या जागेवरती बसलेले आहेत, तुम्ही त्यांचं समर्थन करत आहात. अशा मुख्यमंत्र्यांना गडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्याचा अधिकार आहे का? असा विचार या राज्याची जनता करते.” असंही संजय राऊतांनी यावेळी म्हटलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut criticizes chief minister eknath shinde who visited pratapgad msr
First published on: 30-11-2022 at 11:02 IST