scorecardresearch

“ती सावरकर नव्हे, तर अदाणी गौरव यात्रा”; संजय राऊतांचं शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्र; म्हणाले, “भाजपाचा…”

सावरकरांच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापू लागलं आहे.

sanjay raut critized bjp and shinde government
फोटो – लोकसत्ता ग्राफीक्स टीम

सावरकरांच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापू लागलं आहे. महाविकास आघाडी आणि शिंदे गट-भाजपाकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. अशातच काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभरात सावरकर गौरव यात्रा सुरू करण्याची घोषणा केली होती. दरम्यान, यावरून आता संजय राऊतांनी शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष्य केलं आहे. शिंदे सरकारची ही यात्रा ‘सावरकर गौरव यात्रा’ नसून ‘अदाणी गौरव यात्रा’ आहे, असं ते म्हणाले. दिल्लीत माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – “राज ठाकरे यांच्याकडे व्हिजन आहे, ते तुमच्यासारखे…”; सदू-मधूची भेट म्हणणाऱ्या राऊतांना संजय शिरसाटांचं प्रत्युत्तर!

काय म्हणाले संजय राऊत?

वीर सावरकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा काहीही संबंध नव्हता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सावकरकांना वाळीत टाकलं होतं. आता भाजपाकडून राजकीय ढोंग सुरू आहे. काल मुख्यमंत्र्यांनी वीर सावरकर गौरव यात्रेची घोषणा केली. यावेळी सावरकरांबद्दल दोन वाक्य ते उस्फूर्तपणे बोलू शकले नाहीत. एका कागदावर लिहिलेलं वाचून दाखवत होते. त्यांच्या हृदयात जर सावकर आहे, त्यांनी उस्फूर्तपणे बोलून दाखावयला पाहिजे होतं. पण ते उपमुख्यमंत्र्यांना वाचू का? असं विचारत होते. यालाच गुलामी म्हणातात, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

हेही वाचा – ‘धर्मवीर’ सिनेमात ‘वसंत डावखरे’ साकारणाऱ्या अभिनेत्याचा शिवसेनेत प्रवेश, एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला भगवा

“ही तर अदाणी गौरव यात्रा”

शिंदे-फडणवीस सरकारने वीर सावरकर गौरव यात्रेची घोषणा केली आहे. मात्र, ती अदाणी बचाव यात्रा आहे. अदाणी प्रकरणावरून लक्ष विचलीत करण्यातसाठी सावरकराच्या मुखवट्याखाली हे अदाणी गौरव यात्रा काढत आहेत. शिंदे गट आणि भाजपाने सावरकर गौरव यात्रा काढणं म्हणजे, ही सावरकरांची सर्वात मोठी बदनामी आहे, असेही ते म्हणाले.

“आमचं हिंदुत्व हे शेंडी जानव्याचं हिंदुत्व नाही, तर…”

“वीर सावरकर हे महान देशभक्त, क्रांतिकारक आणि समाजसुधारक होते. आम्हाला त्यांच्या विषयी आदर आहे. त्यामुळे भाजपाच्या ढोंग्यांनी आम्हाला सावरकर शिकवू नये. आम्ही सावरकर जगतो. आम्ही सावकरकरांचं हिंदुत्व स्वीकारलं आहे. आमचं हिंदुत्व हे शेंडी जानव्याचं हिंदुत्व नसून विज्ञानवादी हिंदुत्व आहे”, असेही ते म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-03-2023 at 10:10 IST

संबंधित बातम्या