संजय राऊत- सुप्रिया सुळे डान्सनंतर आता लग्नपत्रिकेचीही चर्चा; #PMkiShaadi ठरतोय आकर्षणाचा विषय

दरम्यान, पूर्वशी-मल्हार यांच्या संगीत सोहळ्यादरम्यान सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांनी केलेला डान्स सध्या चांगलाच गाजतोय.

Sanjay raut daughter wedding
राऊत यांच्या कन्येचा लग्नसोहळा आज २९ नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या मुलीच्या लग्नाची सध्या राज्यभरात चर्चा आहे. राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत यांचा विवाह ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी आज होणार आहे. या लग्नसोहळ्यासाठी राजकीय वर्तुळातले अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, पूर्वशी-मल्हार यांच्या संगीत सोहळ्यादरम्यान सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांनी केलेला डान्स सध्या चांगलाच गाजतोय. आणखी एका गोष्टीची जोरदार चर्चा आहे ती म्हणजे या लग्नाची पत्रिका.

या सोहळ्यातले साखरपुड्याचे, संगीत कार्यक्रमाचे फोटोज सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. त्यासोबतच लग्नपत्रिकाही चांगलीच व्हायरल होत आहे आणि त्याचं प्रमुख आकर्षण म्हणजे या पत्रिकेवरील #PMkiShaadi हा हॅशटॅग.

या लग्न पत्रिकेमध्ये पूर्वशी आणि मल्हार यांचे इंग्रजीत नाव आहे. पूर्वशी (Purvashi) या इंग्रजी नावातील पी (P) तसेच मल्हार (Malhar) या नावातील एम (M) या आद्याक्षरांना घेऊन एक खास हॅशटॅग तयार करण्यात आला आहे. हा हॅशटॅग लग्नपत्रिकेवर छापण्यात आला असून तो सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या लग्नपत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

दरम्यान, राऊत यांच्या कन्येचा लग्नसोहळा आज २९ नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. त्याआधी काल (२८ नोव्हेंबर) प्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांच्या उपस्थितीत संगीत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे याही सहकुटुंब उपस्थित होत्या.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sanjay raut daughter wedding invitation pm ki shaadi hashtag vsk

ताज्या बातम्या