scorecardresearch

Premium

“संजय राऊत औरंगजेबाच्या दरबारातले हुजरे त्यांनी खुशाल…”, ‘सुलतान’ शब्दावरुन शिंदे गटाचं प्रत्युत्तर

संजय राऊत यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा उल्लेख सुलतान आणि उपसुलतान असा केला होता त्यावरुन ज्योती वाघमारेंनी त्यांना उत्तर दिलं आहे.

Shinde Group Answer to Sanjay Raut Comment Sultan
शिंदे गटाचं संजय राऊत यांना जोरदार प्रत्युत्तर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या दत्ता दळवींना अटक करण्यात आली. दत्ता दळवी हे ठाकरे गटाचे नेते आहेत तसंच ते मुंबईचे माजी महापौरही होते. त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या मुद्द्यावरुन ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट असा सामना रंगतो आहे. राज्यात नामर्दांचं सरकार आहे असं संजय राऊत म्हणाले. तसंच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा उल्लेख त्यांनी सुलतान, डेप्युटी सुलतान असा केला. त्यावर शिंदे गटाच्या नेत्या ज्योती वाघमारे यांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलं आहे.

काय म्हणाल्या ज्योती वाघमारे?

“संजय डाऊट तुम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना सुलतान आणि डेप्युटी सुलतान म्हणत असाल ना तर याचा अर्थ तुम्ही अजून मोगलाईतून बाहेरच आला नाहीत. साडेतीनशे वर्षांची सल्तनत आणि सुलतानशाही संपवून छत्रपती शिवरायांनी याच महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केलं. सुलतानाचं नाव घेणाऱ्या तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाही. तुम्ही औरंगजेबाच्या दरबारातले हुजरेच आहात. २६ जानेवारी १९५० रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने या देशात लोकशाही आणली, तुम्ही तर अजून मोगलाईचीच भाषा बोलत आहात. मग राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा द्या आणि पाकिस्तानचा पासपोर्ट काढून तिथे जा आणि खुशाल तिथल्या सुलतानांच्या दरबारात मुजरे करा. “

eknath shinde groups Yuva Sena warns Aditya Thackeray
ठरवले तर वरळीत येऊन पाडू… आदित्य ठाकरे यांना शिंदे यांच्या युवासेनेचा इशारा
tejashwi yadav janvishvas yatra
दहा दिवस अन् ३३ जिल्हे! NDA ला रोखण्यासाठी RJD ची ‘जनविश्वास यात्रा’; तेजस्वी यादव यांना यश येणार का?
Devendra Fadnavis first reaction on Abhishek ghosalkar firing
“गाडीखाली एखाद्या श्वानाचा मृत्यू झाला तर…”, राजीनाम्याच्या मागणीवर देवेंद्र फडणवीसांचे विधान
chitra wagh reply to ubt leader sushma andhare
“विरोधकांनी शहाणपण शिकवण्याची गरज नाही,” चित्रा वाघ यांनी सुनावले; म्हणाल्या, “त्यांना केवळ देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा…”

संजय राऊत नेमकं काय म्हणाले होते?

राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदील असताना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री दुसऱ्या राज्यांमध्ये प्रचारात व्यग्र असल्याची टीका राऊतांनी केली आहे. “अवकाळीचं संकट आस्मानातून कोसळत असताना आपले सुलतान आणि डेप्युटी सुलतान प्रचारात व्यग्र होते. कुणी छत्तीसगडमध्ये, कुणी तेलंगणात होते. जणूकाही ते गेले नसते तर तिथे निवडणुका थांबल्या असत्या. त्यांची मुख्य जबाबदारी होती इथून खोके नेऊन तिथल्या लोकांना सुपूर्त करायची. पण आपली ११ कोटी जनता संकटात असताना त्याबाबतीत त्यांना चिंता नाही”, असं राऊत म्हणाले.

“ही नौटंकी आहे. पण ज्यांचा राजाच नौटंकी आहे, त्यांचे सरदार नौटंकी असणारच. विरोधी पक्षनेते, विरोधी पक्षांचे नेते दोन दिवसांपासून गावागावात जाऊन फिरत आहेत. पण मुख्यमंत्री व त्यांचे सरकार आज जागे झाले आहे”, असंही ते म्हणाले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sanjay raut is aurangzeb hujra he should go to pakistan said jyoti waghmare and answer to his comment sultan scj

First published on: 30-11-2023 at 14:01 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×