scorecardresearch

Premium

“संजय राऊत हा सर्वात मोठा दलाल, त्याने आयुष्यभर..”, राधाकृष्ण विखे पाटील यांची टीका

खासदार संजय राऊत यांच्यावर राधाकृष्ण पाटील यांची बोचरी टीका

What Sanjay Raut Said?
संजय राऊत यांच्यावर राधाकृष्ण पाटील यांची टीका

संजय राऊत हा सर्वात मोठा दलाल आहे. मुंबईतल्या पत्राचाळ घोटाळ्यात मराठी माणसाची फसवणूक करुन कोट्यवधींची माया गोळा केली. कोव्हिडच्या काळात एका बाजूला लोक मृत्यूशी झुंजत होते, मात्र मेलेल्यांच्या टाळूवरचं लोणी खाण्यात ज्याने धन्यता मानली तो संजय राऊत आहे अशी टीका महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

माधव गडकरी हे ज्येष्ठ संपादक होते, ते आज हवे होते त्यांनी संजय राऊतचं कर्तृत्व कसं आहे ते सांगितलं असतं. आपल्याविरोधात लोकांनी ओरड करु नये आणि तक्रार करु नये म्हणून मुंबई उच्च न्यायालयात एका महिलेसंबंधीचं प्रकरण सुरु आहे. असे लोक माझ्यावर जर आरोप करत असतील तर मला काही फरक पडत नाही. आयुष्यभर ज्यांनी दलाली केली त्यांनी दुसऱ्यावर कशाला बोलायचं? अशा लोकांच्या वक्तव्याला प्रसिद्धी मिळते हेच आश्चर्यकारक आहे. हे सगळं माझ्या बदनामीचं षडयंत्र आहे असंही राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. संगमनेरमध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

Ganpat Gaikwad, Mahesh Gaikwad
“भाजपा आमदार गायकवाड यांची नार्को नव्हे, तर…” शिंदे समर्थक महेश गायकवाड यांची टीका
sharad pawar gopichand padalkar
“शरद पवार यांच्यासारखे ५०० लोक भाजपात, ते कोणत्या…”, गोपीचंद पडळकर यांची टीका
ajit-pawar-sharad-pawar-poster-in-pune
शरद पवार आणि अजित पवार यांच्यात ‘मनोमिलनाची आस’, राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांची पुण्यात पोस्टरबाजी
uddhav thackeray and bhaskar jadhav
“उद्धव ठाकरे आणि भास्कर जाधवांची नीच…”, भाजपा आमदाराकडून बोचरी टीका

संजय राऊत यांनी विखे पाटील यांच्यावर साखर कारखाना प्रकरणात आरोप केले. त्याबाबत विचारलं असता संजय राऊत हा सर्वात मोठा दलाल आहे त्याने आयुष्यभर दलालीच केली आहे त्याच्या टीकेला कुठे महत्व देता? असं विखे पाटील यांनी म्हटलं आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sanjay raut is the biggest middleman he has done only this things said minister radhakrishna vikhe patil scj

First published on: 20-09-2023 at 20:26 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×