शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना पक्षाला मोठं खिंडार पडलं आहे. बंडखोरी झाल्यापासून ठाकरे गट आणि शिंदे गट आमने सामने आले असून दोन्ही गटांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. तसेच दोन्ही गटांकडून एकमेकांना राजकीयदृष्ट्या संपवण्याची भाषा केली जात आहे.

अलीकडेच संजय राऊतांना पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. सुमारे १०० हून अधिक दिवस तुरुंगात राहिल्यानंतर राऊतांची जामिनावर सुटका झाली. या सर्व घडामोडीनंतर संजय राऊतांनी वर्षाच्या शेवटी एक खास ट्वीट केलं आहे. सोबतच त्यांनी सूर्यास्ताचा फोटो शेअर केला आहे.

is it good to work 12 hours during pregnancy
गर्भावस्थेत बारा तास काम करणे कितपत योग्य आहे? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात, गर्भावस्थेत किती काम करावे?
Accused kidnap minor girl
अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीला बिहारमध्ये अटक
jalgaon gold price marathi news
जळगाव सुवर्णनगरीत सोन्याची ७५ हजारांकडे वाटचाल
500 Years Later Surya Grahan Collides With Rarest Chaturgrahi Yog
५०० वर्षांनी सूर्य ग्रहणाला अद्भुत दुर्मिळ योग; ८ एप्रिलपासून ‘या’ राशींच्या नशिबात अमाप श्रीमंती, नशीब चमकणार

हेही वाचा- “लहान व्यक्तीवर मी बोलत नाही”; शरद पवारांच्या विधानावर शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर, म्हणाले, “माझ्या वडिलांपेक्षा…”

संजय राऊतांनी आपल्या ट्वीटमध्ये मिथीलेश बारीया यांची चारोळी शेअर केली आहे. “कौन कहता हैं वक्त मरता नही… हमने सालों को खत्म होते देखा है डिसेंबर में…!” अशी शायरी संजय राऊतांनी शेअर केली आहे. राऊतांच्या या शायरीवर राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लावले जात आहेत.