मुंबई: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे राजकारण पुन्हा एकदा पेटले आहे. राऊत यांनी पोस्टमध्ये सर्व भारतीयांसाठी उद्देशुन व्लादिमीर लेनिन यांचा कोट पोस्ट केला आहे, सोबतच “सध्या भारतीय युवक असाच भरकटलेला आणि मंद झालाय” असाही उल्लेख केला आहे. या वरुन शिंदेसेनेसह भाजपा चांगलीच आक्रमक झाली आहे.

या विधानाचा निषेध करण्यासाठी संजय राऊत यांच्या भांडुप येथील निवासस्थानाबाहेर शिंदे सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे. दरम्यान काही अनुचित घडू नये, यासाठी निवासस्थानाबाहेर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

संजय राऊत यांनी केलेली पोस्ट नेमकी काय आहे?

या पोस्टमध्ये व्लादिमीर लेनिनच्या फोटोसह संजय राऊत यांनी लेनिनचा एक कोट दिला आहे.

संजय राऊत यांच्या भांडुप येथील निवासस्थानाबाहेर पोलिस बंदोबस्त

या पोस्टचा निषेध करण्यासाठी आज संजय राऊत यांच्या भांडुप येथील निवासस्थानाबाहेर शिंदे सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. यादरम्यान काही अनुचित घडू नये, यासाठी निवासस्थानाबाहेर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.