मागील काही दिवसांपासून संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीवरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. संभाजीराजे यांनी शिवसेनेत प्रवेश केला तरंच आम्ही त्यांना राज्यसभेसाठी पाठिंबा देऊ, असा पवित्रा शिवसेनेने घेतला होता. त्यानंतर आता राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेने आपला उमेदवार जाहीर केला आहे. एकीकडे या राजकीय घडामोडी घडत असताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीत वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाल्याचं राऊत यांनी सांगितलंय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> चिनी व्हिसा प्रकरण; सीबीआयनंतर आता कार्ती चिदंबरम यांच्यावर ईडीकडूनही गुन्हा दाखल

शरद पवार यांच्यासोबत नेमक्या कोणत्या विषयावर चर्चा झाली, याबाबत राऊत यांनी माहिती दिली नाही. मात्र “शरद पवार यांची सदिच्छा भेट घेतली. त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी गेलो होतो. उद्या शिवसेनेचे माझ्यासह एकूण दोन उमेदवार राज्यसभेसाठी अर्ज भरत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेदेखील येत आहेत. शरद पवारदेखील अर्ज भरण्यासाठी येत आहेत. शरद पवार हे महाराष्ट्राचे, देशाचे उत्तुंग नेतृत्व आहे. महाविकास आघाडी सरकारचे ते आधारस्तंभ आहेत. ते वडीलधारी आहेत. त्यांचा आशीर्वाद घेणं माझ्यासाठी गरजेचं होतं. या भेटीत अनेक विषयांवर चर्चा झाली,” असं संजय राऊत म्हणाले.

हेही वाचा >>> ‘वंदे मातरम्’ला जन गण मनसारखा समान दर्जा द्या, उच्च न्यायालयात जनहित याचिका

संजय राऊत आणि शरद पवार यांच्यात कोणत्या विषयावर चर्चा झाली, याची स्पष्ट माहिती राऊत यांनी दिली नाही. मात्र अनेक विषयांवर चर्चा झाल्याचे म्हणत राऊत यांनी कोडं कायम ठेवलं.

हेही वाचा >>> “१६ मे रोजीच काँग्रेस पक्ष सोडला”, कपिल सिब्बल यांचा मोठा निर्णय, सपाच्या पाठिंब्यावर राज्यसभेत जाणार

दरम्यान, राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संभाजीराजे यांना पाठिंबा हवा असेल तर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करावा असा पवित्रा शिवसेनेने घेतला होता. मात्र संभाजीराजे यांनी यावर भूमिका घेतली नाही. त्यानंतर आता शिवसेनेने कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तसेच राऊत आणि संजय पवार उद्या राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेदेखील उपस्थित राहणार आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut meets sharad pawar amid rajyasabha nomination prd
First published on: 25-05-2022 at 18:33 IST