अमरावती : आपण आधीपासूनच महाविकास आघाडीसोबत आहोत, भविष्यातही राहणार आहोत, पण आता विधानपरिषदेच्या निवडणुकीत गुप्त मतदान असल्याने पुन्हा आपल्यावर संशय घेतला जाऊ शकतो. त्यामुळे एकतर मतदानाच्या वेळी संजय राऊत यांना मतपेटीसमोर उभे करा किंवा आपला मतदानाचा अधिकार संजय राऊत यांना द्या, असा प्रस्ताव आपण महाविकास आघाडीसमोर ठेवणार आहोत, असा टोला मोर्शीचे अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना लगावला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देवेंद्र भुयार म्हणाले, ”राज्यसभा निवडणुकीच्या मतदानानंतर आपले नाव घेऊन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अपक्षांवर अपयशाचे खापर फोडले होते. त्यावेळी आपण कुठलीही दगाबाजी केली नाही. महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान केल्याचे आपण छाती फोडून तर दाखवू शकणार नाही. संजय राऊत यांनी विश्वास ठेवायला हवा,”

देवेंद्र भुयार म्हणाले, ” महाविकास आघाडीचे नेते भ्रमात आहेत. राज्यसभा निवडणुकीच्या वेळी त्यांचा भ्रमाचा भोपळा फुटला होता. अपक्ष आमदारांच्या मतदार संघाच्या विकासाच्या अनुषंगाने काही अपेक्षा असतात. ते काही त्यांच्या घरातील प्रश्ना सांगणार नाहीत, पण मतदार संघात विकासासाठी निधीची आवश्यकता असते, तो मिळावा, त्यांचे प्रश्नर ऐकून घेतले जावेत, ही माफक अपेक्षा असते.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut mla devendra bhuyar mahavikas aghadi voting councils election amy
First published on: 17-06-2022 at 14:49 IST