Sanjay Raut on Cabinet Expansion: महायुतीचे सरकार स्थापन होऊनही अद्याप मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप झालेले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली. मात्र त्यांना अद्याप खातेवाटप झालेले नाही. एकनाथ शिंदे यांना गृह आणि अजित पवार यांना अर्थ खाते देण्यास भाजपाने विरोध दर्शविला आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील काही नेत्यांना मंत्रिपद नको, अशीही भूमिका घेतलेली आहे. त्यामुळेच मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात अडचणी येत असल्याची टीका आता विरोधक करत आहेत. शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी यापुढे जाऊन टीका केली. ते म्हणाले, मंत्रिमंडळाची घोषणा झाल्यानंतर काही नेत्यांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता आहे. त्यामुळे रुग्णवाहिका तयार ठेवली पाहीजे.

काय म्हणाले संजय राऊत?

माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, काही लोकांना मंत्रिमंडळाच्या विस्तारादरम्यान हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. रुग्णवाहिका तयार ठेवल्या पाहीजेत. एकनाथ शिंदे यांना आता कुणीही विचारत नाही. त्यांची नाराजी किंवा आनंद हा विषय दिल्लीसाठी संपलेला आहे. एकनाथ शिंदे, अजित पवार आणि त्यांच्याबरोबरचे आमदार हे कळसूत्री बाहुलीप्रमाणे असून ते गुलाम झाले आहेत. गुलामांनी बंडाची भाषा करायची नसते, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले आहे. गुलामांना आपल्या हक्कांसाठी बलिदान द्यावे लागते. मात्र ही हिंमत यांच्यात नाही.

Hemlata Patil
Hemlata Patil : काँग्रेसला मोठा धक्का? ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रवक्त्या डॉ.हेमलता पाटील पक्ष सोडणार?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
What Ajit Pawar Said?
Ajit Pawar : धनंजय मुंडे नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देणार का? विचारताच अजित पवारांचं उत्तर, “मी इतकं स्पष्ट सांगतो….”
Sanjay Raut Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : वाल्मिक कराड आणि फडणवीसांचं नेमकं नातं काय? संजय राऊतांचे मुख्यमंत्र्याना गंभीर सवाल
Anil Deshmukh criticized BJP and amit shah
बोलघेवडेपणा करू नका!अमित शहा यांच्या नेत्यांना कानपिचक्या
Sanjay Raut on MVA
Sanjay Raut on MVA: महाविकास आघाडी फुटली का? संजय राऊतांनी केलं स्पष्ट; म्हणाले, “आम्ही भाजपामध्ये असताना…”
Nitish Kumar
Nitish Kumar : नितीश कुमार ‘ॲक्शन मोड’वर; बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करणार?
Hasan Mushrif
Hasan Mushrif : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत हसन मुश्रीफ यांचं विधान चर्चेत; म्हणाले, “आता पुढील निवडणुकीच्या…”

हे वाचा >> Sanjay Raut: ‘फुटणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे’, शरद पवार गटाचे खासदार अजित पवारांची साथ देणार? संजय राऊत संतापले

आम्हीही अख्खा भाजपा खाली केला असता

महाविकास आघाडीचे काही आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा भाजपाच्या नेत्यांनी केला होता. यावरही संजय राऊत यांनी टीका केली. ते म्हणाले, त्यांच्याकडे प्रचंड काळा पैसा आहे. पोलीस, ईडीस, सीबीआय, आयटी अशा यंत्रणा आहेत. त्यामुळे ते अशाप्रकारचे दावे करू शकतात. अशाप्रकारच्या यंत्रणा आमच्याकडे असत्या तर अख्खा भाजपा आम्ही १५ मिनिटांत खाली केला असता.

तर पहिला हुतात्मा संजय राऊत असेल

“भाजपाने मतपत्रिकेवर निवडणूक घेऊन दाखवावी, निकालाची सुरुवात होताच अर्धे भाजपावाले देश सोडून पळून जातील. माझ्यासारखा माणूस कुणाला घाबरत नाही. आम्ही तुरूंगवास सहन केला आहे. रक्त सांडले, रक्त पाहिले असून आता आम्ही सभ्य झालो आहोत. सभ्य आहोत तोपर्यंत ठीक आहे, पण जर कुणी महाराष्ट्राच्या मुळावर येण्याचा प्रयत्न करत असेल तर पुन्हा १०५ हुतात्मे देण्याची तयारी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत आहे आणि पहिला हुतात्मा संजय राऊत असेल”, असेही संजय राऊत पुढे म्हणाले.

Story img Loader