काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आडनानावर टीका करताना केलेल्या वक्तव्याप्रकरणी राहुल गांधींवर मानहानीचा गुन्हा दाखल केला होता. त्यावर आज ( २३ मार्च ) गुजरातमधील सुरत येथील न्यायालयात सुनावणी पार पडली. तेव्हा न्यायालयाने राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यावर शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, “शिक्षा ठोठावण्यात आलेलं, न्यायालय गुजरातमध्ये आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे वेगळा निकाल लागेल, याची अपेक्षा नव्हती. राहुल गांधींनी एक राजकीय सभेत भाषण केलं होतं. हे मोदी ते मोदी… आणि मग मोदी कसे पळून जातात, हे राहुल गांधी आपल्या भाषणात बोलले होते. याच्यात कोणाची आणि का मानहानी झाली, हे स्पष्ट व्हायला हवं. पण, शिक्षा ठोठावण्याचं काम यांच्या हातात आहे.”

हेही वाचा : मोदी आडनाव अवमानावरून राहुल गांधी दोषी, दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर पहिल्यांदाच केलं भाष्य, म्हणाले…

“ईडी, सीबीआय आणि न्यायालय हे एका विशिष्ट दिशेने जात आहेत. ही दिशा देशात हुकूमशाहीला आमंत्रण देणारी आहे. विरोधकांचा आवाज दडपण्याची दिशा आहे. याच्याने विरोधकांचं ऐक्य अजून मजबूत होणार आहे. राहुल गांधींनी लंडनमध्ये केलेल्या वक्तव्यावरही काहीजण कारवाईची भूमिका घेत आहेत. आज अचानक सुरतचा निकाल लागला,” असं संजय राऊतांनी सांगितलं.

हेही वाचा : “…तर मोदींसह भाजपाच्या काही नेत्यांना जन्मठेप होईल”; राहुल गांधींना झालेल्या शिक्षेवरून सचिन सावंतांचं टीकास्र!

“अडाणी प्रकरणावरून सरकारी पक्षाकडून संसद चालू दिली जात नाही. अशा तऱ्हेने देशाची पाऊले हुकूमाशाहीच्या दिशेने पडत आहेत. पण, देशाच्या लोकशाहीसाठी आम्ही लढत राहू,” असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut on rahul gandhi first reaction after defamation case modi surname surat court ssa
First published on: 23-03-2023 at 16:50 IST