विधान परिषदेच्या निवडणुकीत दोन्ही उमेदवारांचा विजय झाला असला तरी शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे महत्त्वाचे नेते एकनाथ शिंदे हे ‘नॉट रिचेबल’ असल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांच्याशी शिवसेनेकडून काल रात्रीपासूनच संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. असं असतानाच आता एकनाथ शिंदे हे गुजरातमध्ये असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांनी दिल्या आहेत. मात्र एकनाथ शिंदे नेमके कुठे आहेत यासंदर्भातील ठोस माहिती समोर आलेली नाही. त्यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुंबईत यासंदर्भात माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.

“विधान परिषदेच्या निकालानंतर काही आमदारांचा संपर्क होत नाहीये हे सत्य आहे. काही आमदार मुंबईत नाहीत. पण आज सकाळपासून काही आमदारांचा संपर्क झालेला आहे. काही आमदारांना गैरसमजातून त्यांना बाहेर नेण्यात आले आहेत. एकनाथ शिंदे बाहेर असून त्यांच्यासोबत संपर्क झालेला आहे. जे चित्र निर्माण केले जात आहे त्यामध्ये शिवसेनेला कोणतेही तथ्य वाटत नाही. काही ठिकाणी संशयास्पद वातावरण निर्माण झाले आहे. मुख्यमंत्र्यासोबत यासंदर्भात बैठक आहे,” असे संजय राऊत म्हणाले.

BJP tukde-tukde gang Kanhaiya Kumar interview delhi lok sabha election
“मी तुकडे-तुकडे गँगचा असेन तर मोदी मला अटक का करत नाहीत?”; कन्हैयाचं भाजपाला आव्हान
palghar lok sabha constituency, mp rajendra gavit, already started campaigning, before confirming ticket, lok sabha 2024 election, election 2024, bjp, shivsena, mahayuti, maharashtra politics, marathi news
पालघर : उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी खासदारांचा प्रचार
sharad pawar, madha lok sabha constituency, ncp, bjp
माढ्यात शरद पवारांची भूमिका महत्त्वाची
ajit pawar and supriya sule
स्नुषाविरोधात प्रचार करण्यास नकार देण्याची एकनाथ खडसेंची भूमिका सुसंस्कृतपणाची;  खासदार सुप्रिया सुळे यांचा अजित पवार यांना चिमटा

विश्लेषण : एकनाथ शिंदे बंड; फुटीर आमदारांवर पक्षांतरबंदी कायदा लागू होणार का?

“महाराष्ट्रामध्ये राजस्थान आणि मध्य प्रदेश पॅटर्नप्रमाणे उद्धव ठाकरेंचे सरकार पाडावे अशा प्रकारची हालचाल गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे.  त्यांचे प्रयत्न सुरु आहेत पण हे महाराष्ट्रात चालणार नाही. या पद्धतीने तुम्हाला महाराष्ट्र अस्थिर करता येणार नाही. शिवसेनेवर घाव घालणे म्हणजे महाराष्ट्र दुबळा करणे. मुंबई भाजपा अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी कालच्या निकालानंतर मुंबईवर ताबा मिळवण्याची भाषा केली. यासाठी तुम्हीच फाटाफूट घडवून आणत आहात का? मुंबईवर विजय मिळवण्यासाठी शिवसेना दुबळी करण्याचे कारस्थान आहे,” असेही संजय राऊत म्हणाले.

“शिवसेना ही निष्ठावंताची सेना आहे. सत्तेसाठी आणि पदासाठी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसणारी औलाद ही कधी शिवसेनेत निर्माण होणार नाही. जे निर्माण झाले आणि बाहेर पडले त्यांची अवस्था आपण पाहत आहात. ज्यांची नावे माध्यमातून पाहत आहे त्यातले बरेचशे आमदार वर्षा बंगल्यावर आहेत. काही मंत्र्यांशी संपर्क झाल्यावर त्यांनी आम्हाला इथे आणण्यात आल्याचे सांगितले आहे. ते आमदार गुजरात आणि सुरतमध्ये आहेत. त्यांची व्यवस्था गुजरात भाजपाचे अध्यक्ष करत आहे,” असे संजय राऊत म्हणाले.

“ज्या क्षणी त्यांच्याशी संपर्क होईल ते परत येतील. एकनाथ शिंदे कालपर्यंत आमच्यासोबत होते. शिवसेनेचे दोन्ही उमेदवार निवडून यावेत यासाठी ते प्रयत्न करत होते. एकनाथ शिंदे जीवाभावाचे सहकारी आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत जोपर्यंत बोलणे होत नाही तोपर्यंत त्यांच्याबाबत कोणतेही विधान करणार नाही,” असे राऊत यांनी सांगितले.

“मुख्यमंत्री अनेक खात्यांचा आढावा घेत असतात. त्यातून काही गैरसमज झाले असतील तर ते दूर करता येतील. याबाबत शरद पवार यांच्यासोबत बोलणे झाले आहे. पक्षप्रमुखांशी आणि इतर सहकाऱ्यांसोबत आमची चर्चा सुरु आहे. अडीच वर्षापूर्वी सरकार स्थापन करताना भाजपाने एक प्रयत्न केला होता पण तो यशस्वी झाला नाही. त्यानंतर थांबून हा दुसरा घाव घालण्याचा प्रयत्न करत आहेत. हा सुद्धा घाव पाठीवर आहे. एकनाथ शिंदे यांच्यामार्फत त्यांचा सरकार पाडण्याचा डाव आहे पण तो यशस्वी होणार नाही,” असे संजय राऊत म्हणाले.