Sanjay Raut On Bangladesh Political Crisis : बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला असून त्यांनी भारतात आश्रय घेतला आहे. त्यानंतर आता भारतातही यासंदर्भात विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही बांगलादेशमधील परिस्थितीवर भाष्य केलं आहे.

संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांना बांगलादेशमधील अराजकतेबाबतही विचारण्यात आलं. यासंदर्भात बोलताना, शेख हसीना या पंतप्रधान म्हणून अपयशी ठरल्या असून लोकशाहीच्या माळा जपत त्यांनी हुकूमशाही पद्धतीने देश चालवला, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

nitin gadkari on dynastic politics
Nitin Gadkari : “योग्यता नसताना जेव्हा मुलांसाठी तिकीटं मागितली जातात, तेव्हा…”, घराणेशाहीच्या राजकारणावर नितीन गडकरींचं परखड मत
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
What Ravneet Bittu Said About Rahul Gandhi?
Rahul Gandhi : “राहुल गांधी देशातले एक नंबरचे दहशतवादी, त्यांच्यावर बक्षीस..” केंद्रीय मंत्री रवनीत बिट्टू यांचं वक्तव्य
giriraj Singh Rahul gandhi
“देशद्रोह्यांना आरएसएसची विचारधारा कधीच समजणार नाही”, राहुल गांधींच्या टीकेला भाजपाचे प्रत्युत्तर!
narayan rane on devendra fadnavis
देवेंद्र फडणवीसांनी सुरत लुटीबाबत केलेल्या विधानावर नारायण राणेंची एका वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाले…
kangana Ranaut and simranjit singh mann
Kangana Ranaut : “कंगना रणौत यांना बलात्काराचा खूप अनुभव”, माजी खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य
smriti irani praise rahul gandhi
Smriti Irani : टीकेची एकही संधी न सोडणाऱ्या स्मृती इराणी यांनी केलं राहुल गांधींचं कौतुक; म्हणाल्या, “आता त्यांचे राजकारण..”
sanjay raut
Sanjay Raut : “ही मिंध्यांनी पोसलेली अफजलखानाची अवलाद, अशा लोकांना तर…”; दीपक केसरकरांच्या ‘त्या’ विधानावरून संजय राऊत आक्रमक!

हेही वाचा – Bangladesh Political Crisis: बांगलादेशमधून मोठी अपडेट, आंदोलक विद्यार्थ्यांचा पंतप्रधानपदासाठी मोहम्मद युनूस यांना पाठिंबा; दोन दिवसांपूर्वी भारतावर केली होती टीका!

नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

“शेख मुजीबूर रहमान आणि त्यांच्या कुटुंबियांचे भारताशी चांगले संबंध राहिले आहेत. इंदिरा गांधींमुळेच पाकिस्तानचे दोन तुकडे झाले आणि बांगलादेशची निर्मिती झाली. शेख मुजीबूर रहमान यांची हत्या करण्यात आली. पण शेख हसीना यांच्याबाबत इतकंच सांगता येईल, की त्यांनी लोकशाहीचा मुखवटा लावून हुकूमशाही चालवली होती. लोकशाहीच्या नावाखाली जे कुणी आपल्या देशात हुकूमशाही चालवतात, स्वातंत्र धोक्यात आणतात, त्यांना देशातील जनता माफ करत नाही”, असं संजय राऊत म्हणाले.

“बांगलादेशच्या परिस्थितीवरून आपल्या राज्यकर्त्यांनी धडा घ्यावा”

“भारतासारखीच परिस्थिती बांगलादेशमध्ये निर्माण झाली होती. तिथे विरोधकांचा आवाज दाबण्यात आला, निवडणुकीत घोटाळे झाले. विरोधकांना तुरुंगात टाकण्यात आलं. अनेकांची हत्या करण्यात आली. संसदेत नको ते कायदे पारित करण्यात आले. जनता महागाईशी लढत होती. अशावेशी शेख हसीना या पंतप्रधान म्हणून अपयशी ठरल्या. लोकशाहीच्या माळा जपत त्यांनी हुकूमशाही पद्धतीने देश चालवला. त्याचा काय परिणाम झाला, त्याचं चिंतन भारतातल्या राज्यकर्त्यांनीही केलं पाहिजे”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

हेही वाचा – Bangladesh Political Crisis : बांगलादेशमधील परिस्थितीबाबत अमेरिकेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अंतरिम सरकार स्थापन करण्याचा निर्णय…”

उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याबाबती दिली माहिती

दरम्यान, यावेळी बोलताना संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्याबाबतही माहिती दिली. “उद्धव ठाकरे हे आजपासून तीन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर असून ते दिल्लीत राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. तसेच इतर पक्षातील काही नेते उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. याशिवाय उद्धव ठाकरे हे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनीची भेट घेणार असल्याचे” संजय राऊतांनी सांगितले.