scorecardresearch

Sanjay Raut: “दिल्लीत भेट, तुला AK 47 ने…”, संजय राऊतांना लॉरेन्स बिष्णोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी; मोबाईलवर आला मेसेज!

Lawrence Bishnoi Gang Threatens Sanjay Raut: संजय राऊत यांच्या मोबाईलवर आला धमकीचा मेसेज!

खासदार संजय राऊत
खासदार संजय राऊत

Sanjay Raut Received Life Threat: उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना लॉरेन्स बिष्णोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचं समोर आलं आहे. यासंदर्भात संजय राऊतांनी पोलिसांना माहिती दिली असून पोलिसांनी त्यासंदर्भात तपास सुरू केला आहे. संजय राऊत यांच्या मोबाईलवर हा धमकीचा मेसेज आला असून त्यात एके ४७ ने हत्या करण्याची धमकी देण्यात आल्याचं समोर आलं आहे. शुक्रवारी संध्याकाळी ५ च्या सुमारास हा मेसेज आला असून त्यावरून आता तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतल्याचंही सांगितलं जात आहे.

एएनआयनं दिलेल्या वृत्तानुसार, संजय राऊतांना लॉरेन्स बिष्णोई गँगकडून हा धमकीचा मेसेज पाठवला जात असल्याचं त्या मेसेजमध्ये नमूद करण्यात आलं आहे. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्याप्रमाणेच दिल्लीत संजय राऊतांचीही हत्या करण्याची धमकी या मेसेजमध्ये देण्यात आली आहे. यासंदर्भात संजय राऊतांनी मुंबई पोलिसांकडे अधिकृत तक्रार दाखल केली असून त्याचा तपास चालू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “विरोधकांना आलेल्या धमक्या…!”

sanjay raut threat message
संजय राऊतांना आलेला धमकीचा मेसेज…

“…म्हणून संजय राऊतांना धमक्या येत आहेत”

“गेल्या महिन्यातच संजय राऊतांनी गृहमंत्र्यांना यासंदर्भात सूचना दिली आहे की त्यांच्या जीवाला धोका आहे. सरकार या सगळ्या धमकी प्रकरणाला गांभीर्याने न घेता ज्या प्रकारे वक्तव्य केली गेली, ती चुकीचीच होती. संजय राऊत या सगळ्याच्या विरोधात तीव्र लढा देत आहेत. त्यामुळेच अशा धमक्या येत आहेत. सरकारने याची लवकरात लवकर दखल घेतली पाहिजे”, अशी प्रतिक्रिया विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-04-2023 at 10:03 IST

संबंधित बातम्या