Sanjay Raut : महाराष्ट्राची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली आहे. दरम्यान रोज प्रचारसभा सुरु आहेत. अमित शाह यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. उद्धव ठाकरेंकडून राहुल गांधींना बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करायला सांगावं असं अमित शाह म्हणाले होते. यावर संजय राऊत यांनी टीका केली. तसंच महाविकास आघाडीच्या १६५ जागा तरी नक्की येतील असा विश्वासही राऊत ( Sanjay Raut ) यांनी व्यक्त केला.

संजय राऊत काय म्हणाले?

राज्यात विधानसभेची निवडणूक होतेय. अशात कोण किती जागा जिंकणार? याची चर्चा रंगलेली आहे. महाविकास आघाडी किती जागा जिंकणार? याची संख्या संजय राऊत यांनी सांगितली आहे. महाविकास आघाडीला १० जागा मिळणार नाही असं सांगत होते. ३१ जागा जिंकलो. सर्व्हे होता नरेंद्र मोदी ४०० पार. पण बहुमत मिळालं नाही. आता महायुतीचे लोकं कुठून सर्व्हे करतील आणि लोकांमध्ये भ्रम निर्माण करतील. यांचा भरवसा नाही. पण मी सांगतो महाविकास विकास आघाडीला १६० ते १६५ जागा मिळतील, असं संजय राऊत ( Sanjay Raut ) म्हणाले.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

काँग्रेस राष्ट्रवादीचं बाळासाहेबांवर जास्त प्रेम आहे

बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेतल्याशिवाय भाजपा एक इंच पुढे जाऊ शकत नाही. तोच पक्ष भाजपाने फोडला, खरेदी केला आणि एकनाथ शिंदेंना विकला. तुमच्यापेक्षा काँग्रेस राष्ट्रवादीला बाळासाहेब ठाकरेंबाबत जास्त प्रेम आणि आदर आहे. त्यांचं प्रेम तुमच्यासारखं ढोंगी नाही पाठीत खंजीर खुपसणारं असं संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी म्हटलं आहे.

वीर सावकर यांना भारतरत्न द्या ही आमची दहा वर्षांपासूनची मागणी आहे

वीर सावरकरांना भारतरत्न द्या, हे आम्ही दहा वर्षांपासून सांगतो आहे. का देत नाहीत भाजपाचे लोक? वीर सावरकरांना भारतरत्न देणं हे अमित शाह यांच्या हातात आहे. ते का देत नाहीत? बाळासाहेब ठाकरेंच्या संदर्भात आम्हाला कुणाच्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तुम्ही तुमच्या बॅनर आणि पोस्टरवरचा फोटो काढा. तुम्हाला महाराष्ट्रात कुणी उभंही करणार नाही. अमित शाह खोटं बोलत आहेत, व्यापारी खोटं बोलतो. दुकानदार आपल्या फायद्यासाठी खोटं बोलतो किंवा भेसळ करतो असा टोलाही अमित शाह यांना संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी लगावला आहे. सत्तेत कोण कुणाला बाजूला ठेवणार हे अमित शाह नाही महाराष्ट्रातली जनता ठरवणार आहे असंही संजय राऊत ( Sanjay Raut ) म्हणाले.

हे पण वाचा- Sada Sarvankar : सदा सरवणकर यांचं वक्तव्य, “राज ठाकरेंच्या मनात काय ते मला..”

अमित शाह यांनी ४० आमदार विकत घेतले असतील पण ते..

अमित शाह यांनी ४० आमदार विकत घेतले असतील, पण त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला विकत घेतलेलं नाही. अमित शाह हे महाराष्ट्राचे नेते नाहीत, देशाचे नेते होऊ शकत नाहीत. ईडी, सीबीआय, यंत्रणा यांच्या मदतीने ते फक्त दहशत पसरवू शकतात असं संजय राऊत म्हणाले आहेत. भाजपाकडे सध्या कुठलाही विषय नाही. विकासाचा विषय, रोजगाराचा विषय नाही, शेतकऱ्यांचा विषय नाही. त्यांच्याकडे फक्त धर्म आणि टोप्या एवढाच विषय आहे. महाराष्ट्रात त्यांच्या टोप्या आता चालणार नाहीत अशीही बोचरी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

Story img Loader