scorecardresearch

“भाजपाचा मोठा गेमप्लान चालू होता, पण…”, वर्ल्डकप फायनलबाबत संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

भाजपाच्या दुःखात मी सहभागी आहे. कारण वर्ल्डकप आम्हीच जिंकणार आहोत, असा भाजपाचा थाट होता, तसेच नरेंद्र मोदींच्या उपस्थितीमुळे भारताने वर्ल्डकप जिंकला असा प्रचार करण्यासाठी भाजपा सज्ज होती, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

sanjay raut narendra Modi
संजय राऊत म्हणाले, भारताचा पराभव झाला, त्यामुळे लोकांना वाईट वाटलं, त्यात आपणही सहभागी व्हायला हवं.

एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा २०२३ च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करून जेतेपदावर नाव कोरलं. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ६ गडी राखून पराभव केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने विक्रमी सहाव्यांदा एकदिवसीय विश्वचषकावर आपल्या देशाचं नाव कोरलं. या सामन्यातील भारताच्या पराभवावर जगभरातून प्रतिक्रिया येत आहेत. अंतिम सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्याऐवजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आला, यावरून बीसीसीआयवर टीका होत आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील खासदार संजय राऊत यांनीदेखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.

खासदार राऊत म्हणाले, मुंबई ही क्रिकेटची पंढरी आहे हे सगळ्यांना माहिती आहे. अशा प्रकारचे मोठ्या स्पर्धांमधले मोठे सामने (अंतिम सामना, बाद फेरीतले सामने) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होतात. परंतु, मुबंईतून सगळंच खेचून नेलं जातंय. मुंबईतले उद्योग, मोठी व्यावसायिक कार्यालये, पैसे आणि आता क्रिकेटही नेलं जात आहे. या ओढाताणीत गडबड झालेली दिसते.

chandra shekhar bawankule
नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशाच्या अमृतकाळाचे साक्षीदार होण्यास सज्ज व्हा; चंद्रशेखर बावनकुळे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन
What Supriya Sule Said?
“देवेंद्र फडणवीस यांनी घरं फोडण्यात आणि पक्ष फोडण्यात वेळ…”, सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप
Narendra Modi Vladimir Putin
“भारताकडून शिकण्यासारखं आहे, त्यांनी…”रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्याकडून मोदींच्या ‘त्या’ निर्णयाचं कौतुक
Mk Stalin Udaynidhi k ponmudi
‘इंडिया आघाडी सनातन धर्माच्या विरोधातच’, उदयनिधी यांच्यानंतर द्रमुकच्या मंत्र्यांवर भाजपाची टीका

संजय राऊत म्हणाले, आपला संघ उत्तम खेळला. रोहित शर्माच्या नेतृत्वात आपण सलग १० सामने जिंकले. परंतु, अंतिम सामन्यात नरेंद्र मोदी स्टेडियमवर आपण हरलो. अनेकजण म्हणत आहेत की, हा सामना वानखेडे स्टेडियमवर झाला असता तर आपण जिंकलो असतो. मला त्यातली फार माहिती नाही. कारण मी मोठा क्रिकेटरसिक नाही.

हे ही वाचा >> “…म्हणून कपिल देव यांना वर्ल्डकप फायनलचं आमंत्रण दिलं नाही”, नाव न घेता संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींना टोला

खासदार राऊत म्हणाले, अहमदाबाद येथील स्टेडियमचं सरदार वल्लभभाई पटेल हे नाव काढून टाकलं आणि त्या स्टेडियमला नरेंद्र मोदी स्टेडियम असं नाव दिलं. कारण, यांना तिथे वर्ल्डकप खेळवायचा आणि जिंकायचा होता. भारत जर त्या सामन्यात जिंकला असता तर नरेंद्र मोदी स्टेडियमवर जिंकला, नरेंद्र मोदी तिथे उपस्थित होते म्हणून जिंकला अशा प्रकारचा प्रचार करायचा असा भाजपाचा मोठा गेमप्लॅन पडद्यामागे सुरू होता. परंतु, या देशाचं दुर्दैव की आपले खेळाडू चांगले खेळूनही आपण हरलो.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sanjay raut says bjp was making gameplan political in india vs australia world cup final asc

First published on: 20-11-2023 at 12:33 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×