पुण्यामध्ये आज मनसेचा सोळावा वर्धापन दिन सोहळा पार पडला. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात तुफान फटकेबाजी केली. राज्य सरकार आणि विरोधकांवर निशाणा साधतानाच राज ठाकरेंनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांची नक्कल करताच उपस्थितांमध्ये तुफान हशा पिकला. “संजय राऊत किती बोलतात”, असं म्हणत राज ठाकरेंनी त्यांच्यावर टीका केली. यावरून आता संजय राऊत यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळे आता मनसे आणि शिवसेना यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे.

“नक्कल मोठ्या माणसाचीच करतात”

राज ठाकरेंनी नक्कल केल्याबाबत माध्यम प्रतिनिधींकडून विचारणा होताच संजय राऊतांनी त्यांच्या शैलीत त्याला उत्तर दिलं. “नक्कल मोठ्या माणसाचीच करतात. तुम्हीही बोला. सगळ्यांनी बोलावं अशी परिस्थिती आहे. ईडीनं बोलावलं म्हणून आम्ही गप्प बसलेलो नाही. आम्ही बोलत राहू. आम्हाला कुणाची भीती नाही”, अशा शब्दांत संजय राऊतांनी प्रतिटोला लगावला आहे.

Ajit pawar
VIDEO : “माझा रेकॉर्ड…”, अजित पवारांची मिश्किल टिप्पणी; म्हणाले, “सहा वेळा उपमुख्यमंत्री व्हायला…”
Jitendra-Awhad
“निवृत्त न्यायाधीशांनाही कळू लागले आहे की…”, ‘त्या’ पत्रावरून जितेंद्र आव्हाडांची टीका
Ulta-Chashma
उलटा चष्मा: नेहरू नव्हेत, बोस..!
Supriya Sule
“सगळे पुरूष माझ्याविरोधात…”, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य; म्हणाल्या, “मी स्वाभिमानी मुलगी, मोडेन पण वाकणार नाही!”

“ते संजय राऊत किती बोलतायत?”, राज ठाकरेंचा खोचक शब्दांत टोला; म्हणाले, “कॅमेरा लागला की हे…!”

“आम्ही कुणाचे मिंधे नाही. ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे. इथे डुप्लिकेट, नकली काही नाही. जे सत्य आहे, जे प्रखर आहे ते शिवसैनिक बोलणार. कर नाही त्याला डर कशाला? आमचं राजकारण नकलांवर उभं नाहीये. आमचं राजकारण कामावर, स्वाभिमानावर आणि संघर्षावर उभं आहे”, असं देखील संजय राऊत यावेळी म्हणाले.

राज ठाकरेंनी केली राज्यपालांची नक्कल; म्हणाले, “..तेव्हा असं वाटलं राज्यपाल लगेच माझा हातच बघायला लागतील”!

“मुख्यमंत्री आजारी असल्यामुळेच…”

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मुख्यमंत्री आजारी असल्यामुळेच पुढे ढकलण्यात आल्याचा दावा राज ठाकरेंनी केल्यासंदर्भात देखील संजय राऊतांनी टोला लगावला आहे. “काही लोक आजारी नसतानाही सक्रीय नसतात. मुख्यमंत्र्यांइतकं सक्रीय सध्या कुणीच नाही. म्हणून तर राज्य पुढे चाललंय”, असं राऊत म्हणाले.

Raj Thackeray : “असं वाटतं मोदींना सांगावं दर महिन्याला दोन दिवस…”, पुण्यात राज ठाकरेंची फटकेबाजी!

काय म्हणाले राज ठाकरे?

“ते संजय राऊत किती बोलतायत? सगळ्यात त्यांची एक अॅक्शन असते. कॅमेरा लागला की हे सुरू. कॅमेरा हटला की पुन्हा नॉर्मल. हे अॅक्शन कुठून आणतात? डोळे, भुवया उडवून बोलणं… बोलणं हा प्रश्न नाही. आपण किती बोलतो? आपण काय बोलतो? कसं बोलतो? हा प्रश्न आहे. महाराष्ट्रातल्या भविष्यातल्या पिढ्या हे पाहातायत. ते उद्या काय शिकतील?” असं राज ठाकरे म्हणाले आहेत.