Sanjay Raut and Kirit Somaiya : महाविकास आघाडीमधील नेत्यांची अनेक प्रकरणं बाहेर काढणाऱ्या भाजपा नेते किरीट सोमय्या यांना शिवसेना(ठाकरे गट) खासदार संजय राऊत कायदेशीर नोटीस पाठवणार आहेत.

संजय राऊतांना किरीट सोमय्या यांना मिस्टर पोपटलाल असं म्हणत याबाबत स्पष्टपणे इशाराच दिला आहे. ट्वीट्द्वारे संजय राऊत यांनी याबाबत माहिती दिली आहे.

केजरीवाल तुरुंगात काय खातात? ईडीच्या आरोपानंतर वकिलांनी न्यायालयात दिला ४८ जेवणांचा तपशील; इन्सुलिनबाबत न्यायमूर्ती म्हणाले…
Navneet Rana Answer to Sanjay Raut
‘नाची’, ‘डान्सर’, बबली म्हणणाऱ्या संजय राऊतांना नवनीत राणांचं जशास तसं उत्तर, म्हणाल्या, “मला बोलण्याआधी..”
jitendra awhad marathi news, lucky compound building collapse marathi news
“लकी कंपाऊंड दुर्घटनेनंतरही अधिकाऱ्यांनी शिकायला हवे होते, पण…”, आमदार जितेंद्र आव्हाड यांची पालिका अधिकाऱ्यांवर टीका
Narendra Modi and Jawaharlal Nehru
Video: मोदी सरकार उद्योगपतींचं? आरोपांबाबत विचारणा करताच मोदींनी दिला नेहरूंच्या कार्यकाळाचा संदर्भ; म्हणाले…

“किरीट सोमय्या उर्फ भाजपाचे पोपटलाल माझ्याविरोधात तथ्यहिन आरोप करत असून, शिवसेना नेत्यांवर चिखलफेक करत आहेत. मी कायदेशीर कारवाईला सुरुवात केली असून, मिस्टर पोपटलाल यांना लवकरच कायदेशीर नोटीस बजावणार आहे. सत्याचा लवकरच विजय होईल, जय महाराष्ट्र…!”

६ जानेवारी रोजी संजय राऊतांविरोधात शिवडी न्यायालयाने अजमीनपात्र वॉरंट जारी केलं होतं. मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यास संजय राऊत वारंवार गैरहजर राहिल्याने न्यायालयाने हे वॉरंट बजावले होते.

शंभर कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळ्याच्या आरोप राऊत यांनी सोमय्या यांच्यावर केला होता. त्यावरून राऊत यांच्याविरोधात मानहानीचा दावा करण्यात आला होता. शिवडी महानगरदंडाधिकाऱ्यांकडे मेधा यांनी दाखल केलेल्या तक्रारीत, राऊत यांनी केलेले आरोप निराधार आणि पूर्णपणे बदनामीकारक असल्याचे म्हटले होते. तसेच राऊत यांना नोटीस बजावून मानहानीच्या आरोपाखाली फौजदारी कारवाई सुरू करण्याची मागणी केली होती.