शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. शिंदे गट विरुद्ध शिवसेना असा सामना राजकारणात पहायला मिळत आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी भन्नाट ट्विट करत पुन्हा एकदा बंडखोर आमदारांवर टीका केली आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचा फोटो ट्वीट करत ‘कब तक छिपोगे गुवाहाटी में, आना ही पडेगा.. चौपाटी में.. असं म्हणत राऊत यांनी बंडखोरांना इशारा दिला आहे.

नरहरी झिरवाळ यांचा कमरेवर हात ठेवलेला फोटो संजय राऊत यांनी पोस्ट केला आहे. कधीपर्यंत गुवाहाटीत लपून बसणार? कधीतरी मुंबईत यावचं लागेल, असं ट्वीट करत राऊत यांनी बंडखोर आमदारांना इशारा दिला आहे.

१६ बंडखोर आमदारांना नोटीस
एकनाथ शिंदेंसोबत शिवसेनेच्या ३५ पेक्षा अधिक आमदारांनी बंड केले आहे. शिवसेनेने त्यातील १६ आमदारांना नोटीस पाठवली आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी ही नोटीस पाठवली. ४८ तासांमध्ये आपली भूमिका मांडा अन्यथा आमदारकी रद्द होईल, असा इशारा बंडखोर आमदारांना दिला आहे. तर ईडीच्या भीतीमुळे या १६ आमदारांनी बंड केला असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.