scorecardresearch

Premium

सुषमा अंधारे विनयभंग प्रकरणात पोलिसांची क्लीनचिट? संजय शिरसाट स्पष्टीकरण देत म्हणाले…

एका कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यावरून सुषमा अंधारेंनी शिरसाटांविरोधात गुन्हा दाखल केला होता.

sanjay shirsat sushma andhare
संजय शिरसाट सुषमा अंधारे ( लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

गेल्या वर्षी एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर शिवसेनेत उभी फुट पडली. त्यानंतर शिवसेना ( ठाकरे गट ) आणि शिंदे गटातील नेत्यांमध्ये सातत्याने शाब्दीक चकमक होत असते. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आमदार संजय शिरसाट यांच्यावर विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. पण, याप्रकरणात शिरसाट यांना पोलिसांनी क्लीनचीट दिली असल्याचं सांगितलं जात आहे.

छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारेंबद्दल एक विधान केलं होतं. त्याविरोधात सुषमा अंधारेंनी परळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र, प्रकरण संभाजीनगर येथे घडल्याने परळी पोलिसांनी ते वर्ग केलं होतं. पोलीस तपासानंतर आता संजय शिरसाट यांना क्लीनचिट मिळाली असल्याचं वृत्त समोर येत आहे.

virat kohli
विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण
Sharad Pawar NCP
“ते सहसा माझ्या शब्दाला नकार देत नाहीत”; शरद पवारांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा, म्हणाले…
asim sarode on rahul narvekar (1)
“अध्यक्षांनी अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय दिला, तर…”, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य
उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीने कोणते कपडे घालावेत, हे ठरवणारे तुम्ही कोण?

हेही वाचा : “खरी शिवसेना शिंदेंची, ठाकरे गट कोणता वर्धापन दिन साजरा करणार?” भाजपाच्या प्रश्नावर संजय राऊतांचं प्रत्युत्तर; म्हणाले…

यावर संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते. “काही लोकांना प्रसिद्धीची हाव आहे. कोणत्याही प्रकारे त्यांना प्रसिद्धी हवी आहे. अश्लील बोललं असेल, तर राजकारण सोडून देतो, असं आव्हान दिलं होतं. पण, लावलेले आरोप सहन करणार नाही. आज पोलिसांनी क्लीनचिट दिली आहे,” असं संजय शिरसाटांनी सांगितलं.

हेही वाचा : सावित्रीबाई फुले यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण, ‘इंडिक टेल्स’ वेबसाईटवर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश; म्हणाले…

“पोलिसांच्या क्लीनचिटवर किती विश्वास बसतो, माहिती नाही. यावरही ते राजकारण करतील. मात्र, लढाई लढावी लागते. त्यामुळे या कलाकाराने केलेल्या आरोपांवर न्यायालयीन लढाई सुरु आहे. तीही लढणार आहे,” असं शिरसाट यांनी स्पष्ट केलं.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sanjay shirsat on sushma andhare case police clean chit ssa

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×