वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गट यांच्यातील युतीची आज घोषणा करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन तशी घोषणा केली आहे. या घोषणेनंतर राज्यातील शिवशक्ती-भीमशक्तीच्या या नव्या प्रयोगाची चांगलीच चर्चा होत आहे. याच युतीवर शिंदे गटातील नेते संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ही युती जास्त दिवस टिकणार नाही, असे संजय शिरसाट म्हणाले आहेत. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

हेही वाचा >> Uddhav Thackeray And Prakash Ambedkar : ठाकरे गट-वंचितमधील युतीच्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “आमच्या…”

kannada producer Soundarya Jagadish found dead
घरात मृतावस्थेत आढळले प्रसिद्ध चित्रपट निर्माते, काही दिवसांपूर्वी त्यांच्या पबविरोधात दाखल झाला होता गुन्हा
Arvind kejriwal private secretary Bibhav Kumar
केजरीवालांची सावली म्हणून ओळखले जाणारे बिभव कुमार नेमके कोण?
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?
arvind kejriwal
अरविंद केजरीवाल यांच्या जन्मगावातील लोक म्हणतायत…

“उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीत मनापासून युती झालेली नाही. मी प्रकाश आंबेडकर साहेबांना पाहिलेले आहे. खंबीर नेते म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे. व्ही पी सिंह जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा ते ‘प्रकाशजी कहाँ हैं, मुझे उनके साथ खाना खाना हैं,’ असे म्हणाले होते. प्रकाश आंबेडकर त्या पातळीचे नेते आहेत. आज ते उद्धव ठाकरेंसोबत गेले आहेत. यामागचे कारण त्यांनाच माहिती आहे. ही युती टिकणार नाही, असे मला मनापासून वाटत आहे. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या कामापुरती युती केली आहे,” असा दावा संजय शिरसाट यांनी केला.

हेही वाचा >> ठाकरे गट-वंचितच्या युतीची घोषणा, पण ‘फॉर्म्यूला’ काय? उद्धव ठाकरेंनी केलं स्पष्ट; म्हणाले “पुढची राजकीय वाटचाल…”

“आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत काम केलेले आहे. याआधी अनेक लोकांनी त्यांच्यासोबत युती केलेली आहे. पण उद्धव ठाकरेंनी युती केलेल्या लोकांना कोणत्या ठिकाणी ठेवले, हेदेखील आम्ही पाहिलेले आहे. मला वाटतं प्रकाश आंबेडकर ते सहन करणार नाहीत. प्रकाश आंबेडकर एक आक्रमक नेते आहेत. म्हणूनच ही युती टिकाणार नाही. लोकांना दाखवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी ही युती केली आहे,” असेही संजय शिरसाट म्हणाले.

हेही वाचा >> “…तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही अंत होणार”, प्रकाश आंबेडकरांचं विधान; म्हणाले…

“आता उद्धव ठाकरे यांच्याकडी गर्दी कमी झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात नाहीत. काँग्रेसही दूर गेलेली आहे. त्यामुळे गर्दी दिसावी म्हणून त्यांनी हा युतीचा प्रयत्न केला आहे. काय करावे हे उद्धव ठाकरे यांना समजत नाहीये. माघार घेतली तरी लोक नाव ठेवतील, असे उद्धव ठाकरेंना वाटत आहे. त्यांना आता माणसं हवे आहेत,” असेही संजय शिरसाट म्हणाले.