संतोष बांगर हल्ला प्रकरण : अंजनगाव सुर्जी पोलिसांची मोठी कारवाई! ११ शिवसैनिकांना घेतलं ताब्यात; म्हणाले, "अटकसत्र..." | Santosh Bangar Attack Amravati Police Arrested 11 shivsena supporters filed case against 15 to 20 people scsg 91 | Loksatta

संतोष बांगर हल्ला प्रकरण : अंजनगाव सुर्जी पोलिसांची मोठी कारवाई! ११ शिवसैनिकांना घेतलं ताब्यात; म्हणाले, “अटकसत्र…”

बांगर हे रविवारी दुपारी अंजनगाव सुर्जीमधील देवनाथ मठात सहकुटुंब देव दर्शनाकरिता आले होते तेव्हा झाला हल्ला.

संतोष बांगर हल्ला प्रकरण : अंजनगाव सुर्जी पोलिसांची मोठी कारवाई! ११ शिवसैनिकांना घेतलं ताब्यात; म्हणाले, “अटकसत्र…”
पोलिसांनीच दिली यासंदर्भातील माहिती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये अगदी शेवटच्या क्षणी दाखल झालेले आमदार म्हणून ओळख असणाऱ्या संतोष बांगर यांच्या ताफ्यावर रविवारी सायंकाळी अमरावतीमध्ये शिवसैनिकांनी केलेल्या हल्ला प्रकरणात ११ जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. यासंदर्भातील माहिती पोलिसांनीच दिली आहे. या प्रकरणात एकूण १५ ते २० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नक्की वाचा >> संतोष बांगर हल्ला प्रकरण: “आदल्या दिवशी ते ठाकरेंबरोबर…”; पैसे घेतल्याचा उल्लेख करत काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

अमरावतीमधील या हल्ला प्रकरणामध्ये शिवसैनिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती ठाणेदार दीपक वानखडे यांनी दिली आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना या प्रकरणामध्ये १५-२० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अटकसत्र सुरु असल्याचं वानखडे यांनी सांगितलं. “काल लाला चौकामध्ये आमदार बांगर आले होते. त्यांच्या कारवर काही लोकांनी हाताने थापा मारला आणि गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी आम्ही १५ ते २० शिवसैनिकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे,” असं ठाणेदार वानखडे यांनी सांगितलं.

तसेच पुढे माहिती देताना, बांगर यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ला प्रकरणामध्ये “११ लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अटकसत्र सुरु आहे.आरोप निश्चिती करुन आरोपींना न्यायालयासमोर हजर करणार आहोत,” असंही ठाणेकार वानखडे म्हणाले.

बांगर हे रविवारी दुपारी अंजनगाव सुर्जीमधील देवनाथ मठात सहकुटुंब देव दर्शनाकरिता आले होते. शिवसेनेचे बंडखोर आमदार बांगर हे मठात येणार असल्याची कुणकुण तालुक्यातील शिवसैनिकांना लागल्यानंतर शहरासह ग्रामीण भागातील शिवसैनिक सायंकाळी लाला चौकात गोळा झाले. सहा वाजताच्या सुमारास आमदार बांगर यांच्या वाहनाचा ताफा मठाबाहेर पडताच शिवसैनिकांनी हा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. ‘पन्नास खोके एकदम ओके’चे नारे देत शिवसैनिकांनी गाडीवर हातमुक्क्यांनी मारत घोषणाबाजी केली. यावेळी बांगर यांच्यासोबत असलेल्या अंगरक्षकांनाही काही वेळ काय घडत आहे हे कळलत नव्हतं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
“पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिवप्रताप गरुडझेप चित्रपट पाहावा यासाठी प्रयत्न सुरु, कारण…” : डॉ. अमोल कोल्हे

संबंधित बातम्या

गोपीनाथ मुंडेंविषयी सुषमा अंधारेंचे मोठे विधान, नितीन गडकरींचे नाव घेत म्हणाल्या…
संजय राऊतांचे मोठे विधान, म्हणाले “…तर सरकारला अमित शाहादेखील वाचवू शकणार नाहीत”
VIDEO: सुषमा अंधारेंच्या ‘उठ दुपारी आणि घे सुपारी’ टीकेला राजू पाटलांचं प्रत्युत्तर, म्हणाले ‘कर भाषण आणि…’
“आमच्याकडे एक ‘सुशी ताई’ आहेत ज्यांच्या…”, मनसे आमदार राजू पाटलांची सुषमा अंधारेंवर बोचरी टीका
“…तर गंभीर परिणाम भोगावे लागतील”, ‘हर हर महादेव’ चित्रपटावरून संभाजीराजेंचा ‘झी स्टुडिओ’ला इशारा!

व्हिडिओ

ताज्या बातम्या
“बाळासाहेब ठाकरे हे एकमेव राजकारणी होते ज्यांनी…”, ‘काश्मीर फाइल्स’वर बोलताना अनुपम खेरांचं वक्तव्य
“माझ्या लग्नात…” हार्दिक जोशीसह विवाहबंधनात अडकल्यानंतर अक्षया देवधरने शेअर केली खास पोस्ट
पुणे: ३६ व्या आंतरराष्ट्रीय नाईट मॅरेथॉन स्पर्धा; इथिओपियाच्या स्पर्धकांनी मारली बाजी
संजय राऊतांचे मोठे विधान, म्हणाले “…तर सरकारला अमित शाहादेखील वाचवू शकणार नाहीत”
“इंग्रजी भाषा महत्त्वाची आहे पण…” प्रथमेश परबने केलेली पोस्ट चर्चेत