सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्लाप्रकरणी चौकशीसाठी आज भाजपाचे आमदार नितेश राणे हे कणकवली पोलीस स्थानकामध्ये हजर झाले. आज दुपारच्या सुमारास नितेश राणेंनी कणकवली पोलीस स्थानकामध्ये आले. जवळजवळ एक तास त्यांची चौकशी सुरु होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संतोष परब हल्ल्याप्रकरणी आमदार नितेश राणेंना सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होतीय उच्च न्यायालयातही नितेश राणेंना जामीन नाकारला होता. त्यानंतर नितेश राणेंनी सर्वोच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. या प्रकरणी अद्याप सुनावणी झालेली नाही.

अचानक झाले दाखल…
आज अचानक नितेश राणे वकील संग्राम देसाई यांच्यासह कणकवली पोलीस स्थानकामध्ये चौकशीसाठी दाखल झाले जवळपास एक तासभर नितेश राणेंची चौकशी कणकवली पोलीसांकडून करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

प्रकरण भाजपा विरुद्ध शिवसेना…
जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख संतोष परब यांना १८ डिसेंबरला कणकवलीत मारहाण झाली. संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला करणारा मुख्य आरोपी सचिन सातपुते याला सिंधुदुर्ग पोलिसांनी दिल्लीहून अटक केली आहे. त्याने चौकशीदरम्यान नितेश राणे यांचं नाव घेण्यात आलं असल्याची माहिती आहे. नितेश राणे यांची याप्रकरणी कणकवली पोलिसांकडून चौकशीदेखील करण्यात आली. दरम्यान संतोष परब शिवसैनिक असल्याने या प्रकरणाला शिवसेना विरुद्ध भाजपा असा राजकीय रंग मिळालाय.

…अन् नितेश राणे समोर आले
सिंधुदूर्ग जिल्हा बँक निवडणुकीवरुनच झालेल्या संतोष परब मारहाण प्रकरणी नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. हे प्रकरण तापल्यानंतर नितेश राणे अज्ञातवासात होते. पण १३ जानेवारी २०२२ रोजी न्यायालयाने त्यांना अटकेपासून संरक्षण दिल्यानंतर त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतील नूतन अध्यक्षांची भेट घेत अभिनंदन केलं होतं. यावेळी त्यांना भेटण्यासाठी समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Santosh parab attack case nitesh rane inquiry by kankavli police for one hour scsg
First published on: 24-01-2022 at 14:42 IST