scorecardresearch

नातीला आणण्यासाठी हेलिकॉप्टर ; फुलांच्या पायघडय़ा, रांगोळी, कमानी उभारून सरपंचांकडून नातीचे स्वागत

शनिवारी सायंकाळी चार वाजणेच्या सुमारास वांगी क्रीडा संकुलच्या मैदानावर मुलीचे आणि नातीचे हेलिकॉप्टरने आगमन झाले.

नातीचे स्वागत करण्यासाठी जमलेले ग्रामस्थ

सांगली : मुलगा म्हणजे वंशाचा दिवा, असा समज असताना कडेगावनजीकच्या हिंगणगावमधील सरपंचांनी पुण्याहून नातीला आणण्यासाठी चक्क  हेलिकॉप्टरची व्यवस्था तर केलीच पण तीन आठवडय़ाची नात आजोळी येणार म्हणून फुलांच्या पायघडय़ा, रांगोळी आणि स्वागत कमानी उभा करून मिरवणुकीने छकुलीचे स्वागत केले.

िहगणगाव खुर्दचे लोकनियुक्त सरपंच अशोक जाधव यांची कन्या स्नेहल हिचा विवाह कुंडलचे स्वातंत्र्यसेनानी कॅप्टन रामचंद्र लाड यांचा नातू दिग्विजय  लाड यांच्याशी झाला आहे. कन्या स्नेहल हिला २९ मार्च रोजी कन्यारत्न झाले. कन्येसोबत नात येणार म्हणून आजोबा अशोक जाधव यांनी नातीचे हटके स्वागत करण्याचा निर्णय घेतला.

नातीचे हटके स्वागत करण्यासाठी त्यांनी चक्क  हेलिकॉप्टरची व्यवस्था केली. शनिवारी सायंकाळी चार वाजणेच्या सुमारास वांगी क्रीडा संकुलच्या मैदानावर मुलीचे आणि नातीचे हेलिकॉप्टरने आगमन झाले. तिथून घरापर्यंत नातीचे आगमन एका खास सजविलेल्या मोटारीतून करण्यात आले. 

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sarpanch arrange helicopter to bring home first girl child zws

ताज्या बातम्या