धाराशिव : बीड जिल्ह्यातील मस्सा जोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण ताजे असताना तुळजापूर तालुक्यातील जवळगा मेसाईचे सरपंच नामदेव निकम यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. त्यामुळे पोलिसांनी या घटनेकडे अधिक गांभीर्याने लक्ष दिले. मात्र अखेरीस बंदुकीचा परवाना मिळविण्यासाठी खोटारड्या सरपंचाची बनवाबनवी चव्हाट्यावर आली आहे. स्वतःवर हल्ला झाल्याची तक्रार दाखल करणाऱ्या सरपंच निकम यानेच हल्ल्याचा बनाव करीत हे सगळे नाटक रचल्याचे आता उघडकीस आले आहे.

हेही वाचा >>> मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील दोन्ही बोगदे लवकरच सुरु होणार

Three drunken arrested for assaulting policemen
मद्यपींची पोलिसांना धक्काबुक्की; तिघे अटकेत
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
congress leader vijay wadettiwar reacts on criminal in santosh deshmukh murder case
“संतोष देशमुख प्रकरणात आरोपींना पाठीशी घालणारे नालायक…”, वडेट्टीवार यांची टीका
Anda Bhurji, knife attack, Pimpri, Anda Bhurji money,
अंडाभुर्जी खाल्ल्याचे पैसे मागितल्याने चाकूने वार
Amravati , Murder , immoral relationship,
अमरावती : अनैतिक संबंधातून हत्‍या, अपघाताचा बनाव
citizens affected by garbage fires in kolhapur
कोल्हापुरात कचरा आगीने त्रस्त नागरिकांकडून संताप; प्रशासक धारेवर, पालकमंत्र्यांचीही भेट
chaturang article on revolutionary tone of Indian womens liberation
भारतीय स्त्रीमुक्तीचा क्रांतिकारी सूर
beggar murder news in Pune,update in marathi
पुण्यातील लष्कर भागात भिक्षेकऱ्याची मारहाण करुन हत्या

तुळजापूर तालुक्यातील अनेक गावात पवनऊर्जा निर्मितीचे खांब बसविण्याचे काम सध्या वेगात सुरू आहे. बीड जिल्ह्यात पवनऊर्जा प्रकल्पाच्या कामावरून सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाल्यानंतर सर्व स्तरातून निषेध सुरू असतानाच तुळजापूर तालुक्यातील जवळगा मेसाई येथील सरपंच नामदेव निकम यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली होती. मात्र आता हा सगळा प्रकार बनावट असल्याचे पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी सांगितले आहे. सरपंच निकम याने दिलेल्या तक्रारीनुसार व्होनाळा ते जवळगा मेसाई रस्त्यावर २६ डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास त्यांची कार (क्र. MH 12 QT 7790) अडवून दोन नंबर नसलेल्या मोटारसायकलवर तोंड झाकून चार अज्ञात व्यक्तींनी जीवघेणा हल्ला केल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले होते. या हल्ल्यात त्यांच्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्या आणि त्यांच्या अंगावर पेट्रोल भरलेला फुगा फेकण्यात आला. त्यांच्यासोबत त्यांचा मित्र प्रविण इंगळे देखील होता असेही तक्रारीत नमूद करण्यात आले होते. पोलिसांना अगदी पहिल्या दिवसापासून या घटनेत काहीतरी गौडबंगाल असल्याचा संशय होता. कारण ज्याठिकाणी घटना घडली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे त्याठिकाणी रस्त्याचे काम सुरू आहे.

हेही वाचा >>> गुंगीचे शितपेय पाजून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; दापोलीत एकाला अटक

त्यामुळे दुचाकी या रस्त्यावरून भरधाव वेगात जाणे शक्य नाही. दिलेली तक्रार आणि घटनास्थळ यातील तफावत स्पष्ट दिसत होती. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता, निकम यांनी सांगितलेल्या घटनेत आणि घटनास्थळावरील परिस्थितीत अनेक विसंगती आढळून आल्या. त्यानंतर पोलिसांनी त्यांची तपास  पद्धत वापरत अधिक कसून तपास सुरू केला. सरपंच निकम आणि त्याचा मित्र इंगळे यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी केलेली बनवाबनवी चव्हाट्यावर आली आहे. दोघांनीही बनाव केल्याचे कबुल केले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. बंदुकीचा परवाना मिळविण्यासाठी सरपंच नामदेव निकम याने स्वतःवर हल्ला झाल्याचे नाटक रचले. स्वतःच गाडीच्या काचा फोडल्या आणि स्वतःवर पेट्रोल टाकून हल्ला झाल्याचा कांगावा केला. बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यात वातावरण तापले होते. त्यातच निकम यांच्यावरील हल्ल्यामुळे विरोधकांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली होती. मात्र, हा हल्ला बनवाबनवीचा भाग असल्याचे स्पष्ट झाल्याने झाले आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक वासुदेव मोरे, स्थानिक गुन्हे शाखेची टीम, सपोनि भालेराव, सपोनि चासकर यांनी केला. या प्रकरणी पोलिसांनी निकम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Story img Loader