कराड : देशासह राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असतानाच कराड तालुक्यातही असा प्रकार उघडकीस आला आहे. कराड तालुक्यातील एका गावात एका अल्पवयीन मुलीवर दोघांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कराड तालुका पोलिसात मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास गुन्हा नोंद करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी विनोद विलास काटकर यास अटक केली आहे.
हेही वाचा – कोल्हापुरातील दहीहंडीवर राजकीय प्रभाव; पावसातही उत्साह
हेही वाचा – कोल्हापुरात पावसाचा मुक्काम कायम : नदी, धरणातील पाणी पातळीत वाढ
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अल्पवयीन मुलीवर तीन वर्षांपासून एक अल्पवयीन मुलगा व विनोद काटकर या दोघांनी वेळोवेळी मुलीच्या घरी जाऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यातून ती गरोदर राहिली. यावर विनोद काटकरने तिला गोळ्या खायला देऊन तिचा गर्भपात केला. याबाबत अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून विनोद काटकर व त्याचा अल्पवयीन साथीदार या दोघांविरोधात कराड तालुका पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी विनोद काटकर यास अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास फौजदार भिलारी करीत आहेत.