scorecardresearch

भाजपाच्या माजी आमदाराच्या बंगल्यामागे आढळला महिलेचा कुजलेला मृतदेह! साताऱ्यात खळबळ

भाजपाच्या माजी आमदाराच्या बंगल्यामागे एका महिलेचा कुजलेला मृतदेह आढळला आहे.

भाजपाच्या माजी आमदाराच्या बंगल्यामागे आढळला महिलेचा कुजलेला मृतदेह! साताऱ्यात खळबळ
सांकेतिक फोटो

सातारा जिल्ह्यातील भाजपाच्या माजी आमदाराच्या बंगल्यामागे एका महिलेचा कुजलेला मृतदेह आढळला आहे. आमदाराच्या बंगल्यामागेच हा मृतदेह आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. या मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा >> उर्फी जावेदवर चित्रा वाघ संतापल्या, मुंबई पोलिसांकडे केली मोठी मागणी; म्हणाल्या “नंगटपणा करणारी ही बाई…”

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार भाजपाच्या माजी आमदार कांताताई नलवडे यांचा साताऱ्यातील वाडे या गावात एक जुना बंगला आहे. हा बंगला मागील बऱ्याच दिवसांपासून बंद आहे. मात्र बंगल्याच्या मागे सफाई करताना एका महिलेचा मृतदेह आढळला आहे. हा मृतदेह चिखलात टाकून देण्यात आला होता. कुजलेल्या स्थितीत असलेला हा मृतदेह पाहून येथे एकच खळबळ उडाली.

दरम्यान, सातारा पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेतला आहे. पोलिसांकडून मृतदेहाची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-12-2022 at 09:34 IST

संबंधित बातम्या