scorecardresearch

Premium

सातारा:आनंदाचा शिधा वितरणात मुख्यमंत्र्यांचा सातारा जिल्हा राज्यात प्रथम

सातारा जिल्ह्या पाठोपाठ भंडारा जिल्ह्याने ९७.३७ टक्के तर गोंदिया जिल्ह्याने ९६.५३टक्के  वितरण करून अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला आहे.

satara district achieved first rank in distribution of anandacha shidha
प्रतिनिधिक छायाचित्र

वाई: सातारा जिल्ह्यने  ९७.४४ टक्के वितरण करुन आनंदाचा शिधा वितरणामध्ये राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे .राज्यातील गोरगरीब जनतेला गौरी गणपती उत्सव आनंदाने साजरा करता यावा, यासाठी शासनाने आनंदाचा शिधा उपलब्ध करून दिला होता.

हेही वाचा >>> पालकमंत्री शिंदे गटाचे असताना शेतकरी संघाचे कुलूप तोडण्याचे धाडस केलेच कसे? हसन मुश्रीफ यांची विचारणा

Five guardian ministers Gondia district
गोंदिया जिल्ह्यात चार वर्षांत पाच पालकमंत्री!
Agriculture Minister Dhananjay Munde
पूर ओसरला, पुनर्वसन मंत्र्यांनंतर आता कृषी मंत्री नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर
Yellow mosaic Chandrapur
सोयाबीनवर पिवळा मोझॅकचे आक्रमण, चंद्रपूर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज जाहीर करा; पालकमंत्री मुनगंटीवार यांची मागणी
cm eknath shinde, pachora shasan aplya dari
मुख्यमंत्र्यांचा जळगाव दौरा अखेर निश्चित, मंगळवारी जिल्ह्यात विविध कार्यक्रम

पुसेसावळी दंगलीच्या वेळी साताऱ्यात  तीन दिवस नेट सुविधा बंद असतानाही सर्व पुरवठा विभाग अधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांनी केलेल्या अथक परिश्रमामुळे  आनंदाचा शिधा वितरणामध्ये ९७.४४ टक्के  वितरणासह राज्यात प्रथम क्रमांकावर आल्याबद्दल जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी यंत्रणेचे अभिनंदन केले आहे. सातारा जिल्ह्यात तीन लाख ८८ हजार ९०७ पात्र शिधापत्रिकांधारकांपैकी तीन लाख ७८ हजार ९३४ शिधापत्रिकाधारक कुटूंबाना आनंदाचा शिधाचे वितरण करण्यात आले आहे. सातारा जिल्ह्या पाठोपाठ भंडारा जिल्ह्याने ९७.३७ टक्के तर गोंदिया जिल्ह्याने ९६.५३टक्के  वितरण करून अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Satara district achieved first rank in maharashtra for distribution of anandacha shidha zws

First published on: 30-09-2023 at 21:21 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×