सातारा : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात जाणार असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’शी बोलताना फेटाळले आहे. पक्ष बदलण्याचा कोणताही विचार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा – लातूरमध्ये शासकीय वस्तीगृहातील ५० विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा; उपचार सुरू
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावरील नाराजीतून रामराजे पक्षाला सोडचिठ्ठी देत ते राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात जाणार अशी चर्चा शनिवारी जोरात सुरू झाली आहे. हर्षवर्धन पाटलांपाठोपाठ पश्चिम महाराष्ट्रात रामराजे देखील राष्ट्रवादीत ( शरद पवार) प्रवेश करण्याचे हे वृत्त शनिवारी सकाळपासून वृत्तवाहिन्यांवर प्रसारित झाल्याने सातारा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. मात्र हे संपूर्ण वृत्त रामराजे निंबाळकर यांनी फेटाळले असून आपण राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षातच राहणार असल्याचे ‘लोकसत्ता’शी बोलताना स्पष्ट केले.