किरकोळ कारणावरून मुलानेच केली जन्मदात्या आईची हत्या

सातारा जिल्ह्यातील कोरोगाव तालुक्यातल्या रहिमतपूरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ कारणावरून मुलानेच जन्मदात्या आईची हत्या केल्याची घटना घडली आहे.

crime-2
किरकोळ कारणावरून मुलानेच केली जन्मदात्या आईची हत्या (प्रातिनिधीक फोटो)

सातारा जिल्ह्यातील कोरोगाव तालुक्यातल्या रहिमतपूरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ कारणावरून मुलानेच जन्मदात्या आईची हत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. शुल्लक कारणावरुन पोटच्या मुलानेच धारधार शस्त्राने आईचा खून केल्याची घटना घडली आहे. सुलाबाई पवार (६५ वर्ष) असे या महिलेचे नाव आहे.

आईची हत्या केल्यानंतर आरोपी मुलगा पोलीस स्टेशनला हजर झाला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अधिकचा तपास सुरू केला आहे. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात रहिमतपूर येथील बसस्थानक परिसरात शुक्रवारी पहाटेच्या सुमारास मुलाने धारधार शस्त्राच्या साहाय्याने आईचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली.सुलाबाई पवार असे मृतक महिलेचे नाव होते. खून केल्यानंतर संशयित आरोपी शहाजी पवार हा स्वतः रहिमतपूर पोलीस ठाण्यात हजर झाला.त्यानंतर त्याने पोलिसांना मी रागाच्या भरात माझ्या आईचा खून केला असल्याची कबुली दिली.

पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक गणेश किद्रे यांनी दिली असून अधिक तपास रहिमतपूर पोलीस करीत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Satara the mother killed the child for a trivial reason rmt

Next Story
बराक ओबामा यांची रोम्नींवर टीका
ताज्या बातम्या