दिगंबर शिंदे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सांगली : सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी सातवाहन काळात धान्य दळणासाठी वापरले जाणारे जाते कराडमधील डॉ. साळुंखे महाविद्यालयाच्या परिसरात उजेडात आले आहे. मिरज इतिहास संशोधन मंडळाचे प्रा. गौतम काटकर, मानसिंगराव कुमठेकर यांनी या मागील इतिहासाचा मागोवा घेत कराडचा सातवाहनकालीन संदर्भ समोर आणला आहे.

प्राचीन काळातील विविध राजवटीतील इतिहासाच्या पाऊलखुणा कोल्हापूर, मिरज आणि कराड या भागात आजही आढळून येतात. या तिन्ही शहरांजवळ सातवाहनकाळात खोदलेली लेणी आढळून आली आहेत. तत्कालीन प्राचीन व्यापारी मार्गावरील ही गावे होत. मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या वतीने गेली काही वर्षे या भागातील ऐतिहासिक अवशेष, कोरीव लेख यांचा शोध घेतला जात आहे. या अभ्यासादरम्यान कराड येथे कृष्णानदीच्या काठावर असलेल्या डॉ. साळुंखे महाविद्यालयाच्या आवारात सातवाहनकालीन जातं आढळून आलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Satavahana history old search karad ysh
First published on: 30-11-2021 at 01:48 IST