काँग्रेस पक्षाशी बंडखोरी करून अपक्ष उमेदवार म्हणून आपली उमेदवारी दाखल केलेल्या सत्यजित तांबे यांनी निवडणूक पार पडल्यांनतर खळबळजनक गौप्यस्फोट केले आहेत. मला पक्षाने चुकीचे एबी फॉर्म दिले असे सत्यजित तांबे म्हणाले आहेत. तसेच त्यांना देण्यात आलेले कथित एबी फॉर्मदेखील त्यांनी पत्रकार परिषदेत दाखवले आहेत. सत्यजित तांबेंच्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मला देण्यात आलेले एबी फॉर्म चुकीचे होते

“माझ्या माणासाला दोन एबी फॉर्म देण्यात आले. माझा माणासू ते फॉर्म घेऊन निघाला. हे एबी फॉर्म ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे नव्हते. म्हणूनच ते सीलबंद पाकिटात ते देण्यात आले. संध्याकाळी निघाल्यानंतर माझा माणूस सकाळी माझ्याकडे पोहोचला. आम्ही ते पाकीट फोडले. मात्र मला देण्यात आलेले एबी फॉर्म चुकीचे होते. ते एबी फॉर्म नाशिक पदवीधर मतदारसंघाचे नव्हतेच अशी धक्कादायक माहिती आमच्यासमोर आली,” असे सत्यजित तांबे यांनी सांगितले.

हेही वाचा >> ‘कसे निडवून येता ते बघतो,’ आदित्य ठाकरेंचे एकनाथ शिंदेंना खुले आव्हान, म्हणाले “जेवढी ताकद…”

दोन्ही फॉर्मवर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची सही

“अजूनही ते दोन एबी फॉर्म आहेत. यातील एक फॉर्म औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाचा फॉम होता. तर दुसरा फॉर्म नागपूर मतदारसंघाचा होता. या दोन्ही फॉर्मवर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची सही आहे. एबी फॉर्म ही छोटी बाब नाही. मग अशी महत्त्वाची बाब गहाळ का करण्यात आली. आतापर्यंत माझ्यावर अनेकवेळा आरोप करण्यात आले. मात्र मला चुकीचे फॉर्म देण्यात आले होते, हे काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयाने अद्यापही मान्य केलेले नाही,” असा आरोपही सत्यजित तांबे यांनी केला.

हेही वाचा >> शुभांगी पाटलांच्या ‘त्या’ विधानावर भातखळकरांची टीका; सचिन सावंतांचेही जशास तसे उत्तर, म्हणाले “कंगना…”

काँग्रेस प्रदेश कार्यालयाने नवे एबी फॉर्म पाठवले, पण…

“माझ्याकडे चुकीचे फॉर्म आल्यानंतर मी काँग्रेस प्रदेश कार्यालयाला तसा निरोप दिला. तसेच आम्हाला नाशिक पदवीधर मतदारसंघाचे नवे एबी फॉर्म देण्यात यावेत, अशी मी विनंती केली. काँग्रेस प्रदेश कार्यालयाने नवे एबी फॉर्म पाठवले. मात्र त्या फॉर्मवर डॉ. सुधीर तांबे यांचे नाव होते. तसेच दुसऱ्या उमेदवाराच्या जागवेर काहीही लिहिलेले नव्हते. म्हणजेच सत्यजित तांबे उपस्थित नसतील तर दुसरा उमेदार कोणीही नाही, असे काँग्रेस प्रदेश काँग्रेस कार्यालयाने म्हटले होते,” असा खुलासा सत्यजित तांबे यांनी केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Satyajeet tambe said congress party given me wrong in form for nashik graduate constituency election prd
First published on: 04-02-2023 at 16:43 IST