साताऱ्यातील म्हसवे गावच्या हद्दीत असणाऱ्या पोलिसांच्या गोळीबार सरावासाठीच्या राखीव जागेत अभिनेते सयाजी शिंदे यांच्या सह्याद्री देवराई या संस्थेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या बायोडायव्हर्सिटी पार्कला अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय वर्मा यांनी परवानगी नाकारली आहे
सह्याद्री देवराई संस्थेला सातारा जिल्ह्यातल्या म्हसवे गावात पोलीस दलाच्या जागेत झाडे लावण्याची परवानगी तीन वर्षांपूर्वी देण्यात आली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सातारा पोलीस अधीक्षक आणि कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडून ही परवानगी देण्यात आली होती. पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनीही कामाच्या ठिकाणी भेट देत प्रशंसा केली होती. एवढंच नाही तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सह्याद्री देवराई संस्थेला शासकीय यंत्रणांनी मदत करावी असा आदेशही काढला होता. त्यानंतर आता सह्याद्री देवराई संस्थेला पोलीस दलाच्या जागेत काम करण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. 

खासगी संस्थेला पोलीस दलाच्या जागेत काम करता येणार नाही असं कारण त्यामागे देण्यात आलं आहे. मात्र तीन वर्षांपूर्वी परवानगी देण्यात येऊन आत्ताच काम का नाकारलं हे मात्र स्पष्ट करण्यात आलेलं नाही. गृहराज्यमंत्र्यांनी याची गंभीर दखल घेतली आहे.  सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांच्या बायोडायव्हर्सिटी पार्क साठी देण्यात येणारी जागा ही सातारा पोलीस दलाची गोळीबार सरावासाठी राखीव आहे यामुळे महासंचालकांनी जो आदेश काढलेला आहे त्याबाबत पोलीस दल आणि अभिनेते सयाजी शिंदे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी दिली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sayaji shinde tree plantation satara police shambhuraj desai vsk
First published on: 10-01-2022 at 21:44 IST