दोन शालेय विद्यार्थ्यांचा पोहताना बुडाल्याने मृत्यू

भोकरदन तालुक्यातील कुंभारी गावाच्या परिसरात पोहण्यास गेलेल्या दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला.

भोकरदन तालुक्यातील कुंभारी गावाच्या परिसरात पोहण्यास गेलेल्या दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. करण राजेंद्र साळवे (वय १२) व पंकज सुरेश कांबळे (वय १२) अशी या विद्यार्थ्यांची नावे आहेत. गावच्या शिवारातील नाला बांधावरील पाण्यात ते उतरले होते. दुपारी शाळेतून घरी आल्यानंतर ते बाहेर गेले होते. पालकांनी ते घरी आले नाहीत म्हणून त्यांचा शोध घेतला. नाला बांधाच्या काठावर त्यांचे कपडे दिसले. तेथील पाण्यात शोध घेतला असता दोघेही मृतावस्थेत आढळले. भोकरदन पोलिसांनी घटनास्थळास भेट देऊन पंचनामा केला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: School children died while swimming