अमरावतीमध्ये कडक निर्बंध, जमावबंदीचे आदेश ; पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचे नागरिकांना आवाहन

हिंसाचारानंतर अमरावतीमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता आहे.

त्रिपुरामध्ये घडलेल्या घटनेचे पडसाद महाराष्ट्रात अनेक शहरांमध्ये उमटताना दिसत आहेत. अमरावती, नांदेड, औरंगाबादमध्ये हिंसक घटना घडल्याचे दिसून येत आहे. यात अमरातवीतमध्ये घडलेल्या हिंसाचाराने वातावरण अधिकच चिघळले आहे. या पार्श्वभूमीवर आता परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारकने कडक पावलं उचलली आहेत. त्यानुसार अमरावतीमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले असून, जमाबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी ही माहिती दिली आहे. तसेच, नागरिकांना देखील आवाहन केले आहे.

“परिस्थिती चिघळेल अशी प्रक्षोभक वक्तव्ये किंवा सोशल मिडीया पोस्ट कोणीही करू नयेत. अमरावती हे औद्योगिक शहर आहे, या जिल्हाला मोठा सांस्कृतिक-सामाजिक वारसा आहे. अमरावतीच्या लौकिकाला गालबोट लागणार नाही याची काळजी आपण सर्व जण घेऊया.” असं यशोमती ठाकूर यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे.

शांतता व संयम पाळावा –

“अमरावतीमधील परिस्थिती नियंत्रणाखाली येत आहे. माझी सर्व अमरावतीकरांनी विनंती आहे, त्यांनी शांतता व संयम पाळावा. माध्यमांनी देखील दूरचित्रवाणीवर अप्रिय घटनांची दृश्ये दाखवतांना त्यावर वेळ नमूद करावी, जेणेकरून लोकांमध्ये गैरसमज निर्माण होणार नाही. सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे.” असे देखील ट्विट यशोमती ठाकूर यांनी केले आहे.

अमरावतीत बंदला हिंसक वळण; आक्रमक आंदोलकांची दगडफेक, पोलिसांचा लाठीचार्ज!

त्रिपुरात झालेल्या घटनेच्या निषेधार्थ काल राज्यात मुस्लिम संघटनांनी राज्यात विविध ठिकाणी निवेदने दिली. मात्र काही ठिकाणी याला हिंसक वळण लागलं होतं, अमरावतीतही गालबोट लागलं. या पार्श्वभुमिवर आज अमरावती बंदचे आवाहन भाजपाने केलं होतं. मात्र भाजपाच्या या बंदच्या आवाहनला हिंसक वळण लागले. आक्रमक आंदोलकांनी दुकानांवर दगडफेक करत तोडफोड केली. यानंतर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनीही आक्रमक पवित्रा घेत दगडफेक करणाऱ्यांवर लाठीचार्ज केला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Section 144 has been imposed in amravati msr

Next Story
‘बुद्धिस्ट सर्किट’ विकासातून पर्यटनास चालना
ताज्या बातम्या