रेशन दुकानात चक्क दारू विक्री सात लाखांचा माल जप्त

सरकारमान्य रास्त भाव धान्य दुकानात  स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकला

वाई: चिमगणगाव ( ता. सातारा) येथे एका रेशन दुकानातच दारुची अवैध विक्री सुरू होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. याठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून संबंधितास ताब्यात घेतले असून सात लाख रुपयांचा माल जप्त केला आहे.

चिमणगांव ( ता. कोरेगांव ) एक जण सरकारमान्य रास्त भाव धान्य दुकानात बेकायदेशीर दारूची चोरटी विक्री करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्या ठिकाणी ग्राहक पाठवून खात्री झाल्याने  सरकारमान्य रास्त भाव धान्य दुकानात  स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकला . दुकानामध्ये व दुकान मालकाच्या  जीपमध्ये  (एमएच ११ बीव्ही३५५३ ) मध्ये देशी-विदेशी दारूच्या बाटल्या व इतर असा एकुण सात लाख आठ हजार ५७६ रुपयांचा  माल मिळून आला. संशयिताने जिल्हाधिकारी सातारा यांचे कोवीड-19 अनुषंगाने लागू असलेल्या आदेशाचा भंग केल्याने त्याच्या गुन्हा दाखल करुन कारवाई केली आहे.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, सहाय्यक फौजदार जोतीराम बर्गे, हवालदार अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे,शरद बेबले, प्रवीण फडतरे, निलेश काटकर, विशाल पवार, रोहित निकम, सचिन ससाणे, संकेत निकम यांनी केलेली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Seizure of liquor worth rs 7 lakh in ration shop akp

Next Story
नाकर्त्यां लोकप्रतिनिधींमुळे पूरग्रस्त अन्नछत्रात!
ताज्या बातम्या