Senior Economist Dr J F Patil passed away | Loksatta

अर्थतज्ञ डॉ. जे. एफ. पाटील यांचे निधन

शिक्षण, अर्थशास्त्र, सामाजिक कार्य अशा विविध क्षेत्रात डॉ. जयकुमार फासगोंडा पाटील तथा जे. एफ.पाटील यांनी मोलाची कामगिरी बजावली.

अर्थतज्ञ डॉ. जे. एफ. पाटील यांचे निधन
अर्थतज्ञ डॉ. जे. एफ. पाटील यांचे निधन

ज्येष्ठ अर्थतज्ञ, डॉ. जे. एफ. पाटील यांचे बुधवारी रात्री निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. अशक्तपणा आल्याने त्यांना येथील खाजगी रुग्णालयात चार दिवसापूर्वी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले.

हेही वाचा- प्रशासनाची असंवेदनशीलता! न्याय मागणाऱ्या ‘त्या’ मृत दिव्यांग मुलांच्या वडिलांवरच केला गुन्हा दाखल

शिक्षण, अर्थशास्त्र, सामाजिक कार्य अशा विविध क्षेत्रात डॉ. जयकुमार फासगोंडा पाटील तथा जे. एफ.पाटील यांनी मोलाची कामगिरी बजावली. ते मराठी अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष, शिवाजी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख , इचलकरंजीतील समाजवादी प्रबोधिनीचे अध्यक्ष, भारतीय कृषी अर्थशास्त्र परिषदेचे उपाध्यक्ष होते. त्यांची मराठी, इंग्रजी भाषेतील अर्थशास्त्राची अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाने त्यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-12-2022 at 21:54 IST
Next Story
४५ हजारांची लाच घेताना पैठण पंचायत समितीचे अधिकारी सापळ्यात