नाशिक शिक्षक मतदारसंघात ठाकरे गटाने संदीप गुळवे यांना उमेदवारी दिली आहे. संदीप गुळवे यांना आता अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते नरहरी झिरवाळ यांनी जाहीर पाठिंबा दर्शवला असल्याचं म्हटलं जातंय. महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजयी करा, असं नरहरी झिरवाळांनी म्हटल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. कौटुंबिक संबंध असल्याने हा पाठिंबा दिला आहे, असंही नरहरी झिरवळ म्हणाले.

अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते नरहरी झिरवाळ यांचा आज वाढदिवस असून त्यानिमित्ताने संदीप गुळवे यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान बंद दाराआड काही तास या दोघांमध्ये चर्चाही झाली. या चर्चेनंतर माध्यमांशी संवाद साधताना नरहरी झिरवाळ यांनी संदीप गुळवेंना शुभेच्छा दिल्या आहेत. संदीप गुळवे हे महाविकास आघाडीतील मित्र पक्ष ठाकरे गटाचे उमेदवार आहेत.

Sujay Vikhe, Nilesh Lanke selection,
नीलेश लंकेंच्या निवडीला सुजय विखेंकडून आव्हान
Pimpri, Ajit Pawar, ajit gavhane,
पिंपरी : अजित पवारांना धक्का! शहराध्यक्ष गव्हाणे शरद पवार गटात
Amol Kirtikar challenge to Ravindra Waikar MP
वायकर यांच्या खासदारकीला अमोल कीर्तिकरांचे आव्हान
Shivsena, claim, Murbad Constituency,
शिवसेनेचा मुरबाड मतदारसंघावर दावा, वरिष्ठ नेत्यांकडून दावेदारीसाठी वरिष्ठांकडे साकडे
Kishore Darade, Nashik Teacher Constituency,
नाशिक शिक्षक मतदारसंघात किशोर दराडे विजयी
Controversy in Nashik Teacher Constituency election due to distribution of money outside the Centre
केंद्रापर्यंत प्रलोभने अन् मतदानासाठी रांगा; केंद्राबाहेर पैसे वाटपाने नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक वादात
Nashik Teachers Constituency,
नाशिक शिक्षक मतदारसंघात ९० केंद्रांवर मतदानास सुरुवात
nashik teacher elections marathi news
नाशिक शिक्षक मतदारसंघात पैसे वाटपाच्या तक्रारी; १० संशयित ताब्यात

हेही वाचा >> शिंदे गटाच्या बैठकीस अजित पवार गटाचे आमदार उपस्थित, नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या प्रचारात गोंधळाची स्थिती

“वसा वारसा असलेल्या संदीपभाऊंना गुळवेभाऊंचा मोठा वारसा आहे. गुळवेंचं जाण्याचं वय नसतं. परंतु परमेश्वराच्या मनात आलं तर कोणी रोखू शकत नाही. त्यांच्याकडून जी सर्वसामान्य माणसांची सेवा करण्याची अधुरी इच्चा पूर्ण करण्याची अपेक्षा व्यक्त करतो. येथील शिक्षकांना मी त्यांना मदत करण्याचं आवाहन करतो”, असं नरहरी झिरवाळ म्हणाले.

नरहरी झिरवाळ अजित पवार गट सोडणार?

बरेच जण म्हणतात की झिरवाळ परतीच्या वाटेवर आहेत. परंतु, कोण कोणाच्या वाटेवर आहेत, हे समजायला मार्ग नाही. अजितदादांची पद्धत आपण पाहिली आहे. शरद पवारांचंही काम आहे. परंतु, उमदा आणि शिस्तप्रिय नेता म्हणून अजित दादांकडे पाहिलं जातं.

नाशिक शिक्षक मतदारसंघात तिहेरी लढत

दरम्यान, नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातून शिंदे गटाचे विद्यमान आमदार किशोर दराडे, ठाकरे गटातून संदीप गुळवे आणि अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्यात तिहेरी लढत होणार आहे.

प्रचारसभेत गोंधळ

विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुतीत आधीच बिघाडी झाली असताना आता प्रचारातही गोंधळ निर्माण होत असल्याचे दिसत आहे. शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ पालकमंत्री दादा भुसे यांनी आयोजित बैठकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माणिक कोकाटे आणि सरोज अहिरे हे दोन आमदार सहभागी झाल्यामुळे संभ्रम निर्माण झाला. शिंदे गटाच्या बैठकीस उपस्थितीमुळे दोन्ही आमदारांची अडचण झाली असून निवडणूक प्रचारार्थ ही बैठक असल्याची पूर्वकल्पना नव्हती, असे त्यांनी म्हटले आहे. पालकमंत्र्यांचा निरोप असल्याने आम्ही तिथे गेल्याचा दावा दोन्ही आमदारांकडून करण्यात आला आहे.