-रविंद्र जुनारकर
गडचिरोली व दंडकारण्य स्पेशल झोनल समिती सचिव सक्रिय नक्षली कॉम्रेड नर्मदा दी ऊर्फ उप्पुगंटी निर्मला हिच्या स्मृतिप्रीत्यर्थ विविध नक्षलवादी संघटनांनी सोमवार, २५ एप्रिल रोजी दंडकारण्य बंदचे आवाहन केले आहे. दंडकारण्य स्पेशल झोनल समितीचा सचिव विकल्प याने एक पत्रक जारी करून या बंदची माहिती दिली. सलग ४२ वर्षे नक्षल चळवळीत सक्रिय राहिलेल्या नर्मदाचे ९ एप्रिल रोजी कर्करोगाने मुंबईत निधन झाले. त्यानंतरच नक्षलींनी या बंदचे आवाहन केले आहे.

लगतच्या आंध्रप्रदेश राज्यातील कृष्णा जिल्ह्यातील कोंडापावुलुरू गावात १९६० रोजी जन्मलेल्या नर्मदा हिचे वडील कम्युनिस्ट पक्षात सक्रिय होते. त्यामुळे कम्युनिस्ट विचारांचा लहानपणापासूनच तिच्यावर प्रभाव होता. मात्र १९८० सालापासून नक्षल चळवळीत अधिक सक्रिय झाली. यानंतर तिच्यावर दक्षिण गडचिरोली भागात नक्षल चळवळ मजबूत करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. पोलिसांनी ११ जून २०१९ रोजी तिला अटक केली होती. मुंबईतील भायखळा कारागृहात असताना ९ एप्रिल रोजी तिचा मृत्यू झाला.

Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा
Savitri jindal property and net worth
भारतातील सर्वांत श्रीमंत महिलेचा भाजपात प्रवेश; पती निधनानंतर सांभाळला कोट्यवधींचा उद्योग! संपत्ती वाचून व्हाल थक्क
ED and CBI have been the operatives of Narendra Modi in the country for the last 10 years says nana patole
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ईडी व सीबीआय हे कार्यकर्ते; नाना पटोले म्हणतात, “त्यांच्या वॉशिंग मशीनमध्ये…”
piyush goyal
लखलखत्या तरुण तेजांकितांचा आज गौरव; केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल प्रमुख अतिथी

नक्षल चळवळीतील सर्वात सक्रिय महिला नेत्या म्हणून ४२ वर्ष चळवळीत कार्यरत कॉम्रेड नर्मदा हिला नक्षलवाद्यांनी नर्मदा दी असेही संबोधले आहे. तिच्या स्मृतिप्रीत्यर्थ २५ एप्रिल रोजी दंडकारण्य नक्षल संघटनांनी बंदचे आवाहन केले आहे. ‘उत्पीडित जनता की प्यारी नेत्री कॉमरेड नर्मदा दी अमर रहे’ या आशयाचे पोस्टर गडचिरोलीच्या अतिदुर्गम भागात लावण्यात आले आहेत.

हा बंद यशस्वी करण्याचं आवाहनही या पोस्टर्समधून करण्यात आलंय.