scorecardresearch

Premium

वर्धा जिल्ह्यात नाव उलटून सात शेतकऱयांचा मृत्यू

वर्धा जिल्ह्यातील हिंगणगावमध्ये नाव उलटून झालेल्या अपघातात सात शेतमजूरांच्या मृत्यू झाला आहे. तसेच अजूनही पाच मजूर बेपत्ता असल्याचे समजते.

वर्धा जिल्ह्यात नाव उलटून सात शेतकऱयांचा मृत्यू

वर्धा जिल्ह्यातील हिंगणगावमध्ये नाव उलटून झालेल्या अपघातात सात शेतमजूरांच्या मृत्यू झाला आहे. तसेच अजूनही पाच मजूर बेपत्ता असल्याचे समजते.
कान्हापूर परिसरातून शेतीचे कामे उरकून दोन नौकांमधून तीस मजूर हिंगणगावाला परतत होते. वना नदीत विसर्जन घाटाजवळच्या मूर्तीच्या चबूतऱयाला आदळून या नौका उलटल्या. त्यातील सोळा शेतकरीमजुर पोहता येत असल्यामुळे बचावले. परंतु, अपघातात सात जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. मृत्यूंपैकी दोघांची ओळख पटलेली असून उर्वरित मृतदेहांची ओळख पटविण्यात यश आलेले नाही. तसेच अपघातातील मृतांच्या आकडा वाढण्याची शक्यता आहे.

(संग्रहित छायाचित्र)

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Seven farmers death in boat accident

First published on: 09-08-2013 at 11:31 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×