सोलापूर : सामान्य महिलांना लघु उद्योगांसाठी केंद्र सरकारच्या मुद्रा लोन योजनेतून बिनव्याजी कर्ज प्रकरणे मंजूर करून देण्याचे आमिष दाखवून एका महिलेने ७०० पेक्षा अधिक महिलांची सुमारे २५ लाखांची फसवणूक केल्याची घटना उजेडात आली आहे.

यासंदर्भात फसवणूक झालेल्यांपैकी शुभांगी धनंजय गायकवाड (वय ४२, रा. श्रीराम समर्थ पतंजली, जुळे सोलापूर) या लघुउद्योजक महिलेने फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार ज्योती रमेश कांबळे (रा. तळे हिप्परगा, सोलापूर) या महिलेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. १ जानेवारी २०२४ ते ३० सप्टेंबर २०२४ या कालावधीत हा प्रकार घडला. महिलांना फसविण्यासाठी ज्योती कांबळे हिने काही राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत महिलांचा मेळावा घेऊन त्यात प्रातिनिधिक स्वरूपात एका महिलेला मुद्रा लोन योजनेतून एक लाखाच्या कर्जाचा धनादेश प्रदान केला होता. तिने विश्वास संपादन करून सातशेपेक्षा अधिक महिलांना गंडविल्याचे दिसून आले.

akola Congress MP Imran Pratapgarhi criticized corrupt Mahayuti government
महाराष्ट्रामध्ये महायुतीचे महाभ्रष्ट सरकार, काँग्रेसचे खासदार इमरान प्रतापगढी यांची खरमरीत टीका
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
Ajit Gavane statement that distribution of money is defamatory because defeat is visible
भोसरी विधानसभा: पराभव दिसत असल्याने पैसे वाटप केल्याची बदनामी – अजित गव्हाणे
Soybean Price, Vidarbha, Ladki Bahin Yojana,
विरोधकांचे ‘सोयाबीन अस्त्र’ ‘लाडक्या बहीण’चा प्रभाव रोखणार ?
Vanchit Bahujan Aghadi, Bahujan Samaj Party,
आंबेडकरी पक्षांच्या उमेदवारांचा वेलू गगनावरी !
Priyanka Gandhi Kolhapur, Priyanka Gandhi criticizes Narendra Modi, Priyanka Gandhi,
सत्ता, पैशाचा गैरवापर करत मोदींकडून महाराष्ट्रात सरकार – प्रियांका गांधी
Nagpur police arranged mother daughter reunion in pune
नागपूर पोलिसांनी घडवले पुण्यात मायलेकीचे मनोमिलन, आईच्या चेहऱ्यावर हास्य आणि लेकीचा आनंद गगनात मावेना

हेही वाचा – राज्याच्या अनेक भागांना पावसाचा फटका; पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती

शुभांगी गायकवाड व अर्चना पवार या दोघी काळा मसाला तयार करण्याचा लघुउद्योग चालवितात. त्यांना ओळखीच्या माध्यमातून ज्योती कांबळे हिने गाठले आणि लघुउद्योगासाठी केंद्र सरकारच्या मुद्रा लोन योजनेतून प्रत्येकी एक लाख रुपये कर्ज प्रकरणे मंजूर करून देण्याचे आमिष दाखविले. एक लाखाच्या कर्जातून २५ हजार रुपयांचे अनुदान मिळते. म्हणजे ७५ हजार रुपयांचे कर्ज बिनव्याजी फेडता येते, अशी ही योजना असल्याचे ज्योती कांबळे हिने समजावून सांगितले. त्यासाठी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लाभार्थी महिलेच्या नावाने बचत खाते उघडावे लागते आणि कर्ज मंजुरीच्या प्रक्रियेसाठी प्रत्येकी ३५०० रुपये द्यावे लागतात, अशी माहिती देऊन तिने शुभांगी गायकवाड व इतरांचा विश्वास संपादन केला. त्यांच्या ओळखीच्या इतर ९० महिलांकडूनही ज्योती कांबळे हिने प्रत्येकी चार हजार रुपये उकळले. हा सर्व व्यवहार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रधान कार्यालयाजवळ होत होता. तिने आपला प्रभाव पाडण्यासाठी इच्छुक लाभार्थी महिलांना जिल्हा उद्योग केंद्रातही बोलावून घेतले होते.

हेही वाचा – पर्यटकांकडून महिलेची गाडीखाली चिरडून हत्या; रायगड जिल्ह्यातील घटना, आठपैकी तीन आरोपींना अटक

पुढे ज्योती कांबळे हिने शिवछत्रपती रंगभवनाजवळील समाज कल्याण केंद्राच्या सभागृहात सामाजिक कार्यकर्त्या छाया वाघमारे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल आणि माजी महापौर महेश कोठे यांच्या प्रमुख उपस्थितीत महिलांचा मेळावा आयोजिला होता. त्यावेळी एका महिलेला मुद्रा लोन योजनेतून एक लाखाचे कर्ज मंजूर झाल्याचे सांगत त्याप्रमाणे रकमेचा धनादेश दिला होता. हा धनादेश खरा होता की खोटा, हे समजले नाही. नंतर मात्र ज्योती कांबळे हिने कबूल केल्याप्रमाणे मुद्रा लोन योजनेचा लाभ मिळवून देण्यास टाळाटाळ केली. शेवटी हा फसवणुकीचा प्रकार लक्षात आल्यानंतर तिच्याविरुद्ध पोलिसांत धाव घेण्यात आली.