सातारा : पहिल्या पतीस कसलीही कल्पना न देता तब्बल तीन लग्न करून पुन्हा चौथे लग्न केल्याच्या आरोपावरून संबंधित महिलेसह सात जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांनी दिली.
याबाबत प्रवीण गजांकुश (रा. गडकर आळी, सातारा) यांनी शाहुपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुष्पा हरी पोळ ही पतीच्या आईशी भांडण करून अकलूज येथे निघून गेली होती. तिला पुन्हा सातारा येथे येण्यासाठी सांगितले होते; परंतु तिने खोट्या गुन्ह्यामध्ये अडकविण्याची धमकी दिली.
दरम्यान, फिर्यादी आणि त्याच्या आईच्या दागिन्यांचा ऐवज आणि मोबाइल घेऊन पत्नी माहेरी गेली होती. यानंतर संशयित महिलेने पूर्वीचे पती हयात असताना व त्यांच्याशी कायदेशीर घटस्फोट न घेता, चौथे लग्न करून फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पुष्पा हरी पोळ ऊर्फ पुष्पा सतीश करंदीकर, पार्वती हरी पोळ, प्रकाश हरी पोळ, माधुरी प्रकाश पोळ, ज्योती हरी पोळ, सोनाली सुभाष कटके आणि अशोक खंदारे (रा.अकलूज, ता. माळशिरस) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. शाहूपुरी पोलीस अधिक तपास करत आहेत.